Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सावधान.. 'या' 2 दिवशी महाराष्ट्राला पाऊस झोडपणार! काळजी घ्या, सरकारचे आवाहन, 48 खूपच महत्वाचे

Weather alart marathi Heavy Rains to Lash Maharashtra for 2 Days : राज्यात पावसाचा मोठा फटका बसला असून अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह पुर्ण राज्य ओलेचिंब झाले आहे. पाऊस महाराष्ट्राची पाठ सोडत नसून आता महाराष्ट्रात दोन दिवस पाऊस आपला कहर करणार आहे. त्यामुळे शक्य तितकी खबरदारी, काळजी घ्यावी असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Weather alart marathi

का आणि कधी पडणार पाऊस?

महाराष्ट्राजवळ हवेच्या कमी दाबाचा पट्ट तयार होत आहे, त्यामुळे हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, येत्या येत्या २७ आणि २८ तारखेला मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या काळात जोरदार पाऊस अतिवृष्टी होऊ शकते, तसेच पुराचाही धोका संभवतो. आधीच पुराच्या तडाख्यात सापडलेल्या जिल्ह्यांची परिस्थिती पाहता या अनुषंगाने सर्वांनी शक्य तितकी खबरदारी घ्यावी, असं आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आहे.

Take a Poll

आज २५ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तसेच कोकण, गोवा आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

४८ तास महत्वाचे, या जिल्ह्यात पाऊस होणार

येत्या ४८ तासांत रायगड, पुणे जिल्हा, सोलापूर, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशीव जिल्ह्यात तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यांना येलो अलर्ट

पुणे , कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या घाट विभागातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे, म्हणून या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भ हवामान अंदाज

पुढील दोन दिवस विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली,यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार ते अती जोरदार पावसाची शक्यता आहे, म्हणून या जिल्ह्यांना पुणे हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिली आहे. तसेच नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

पुणे शहर आणि परिसर हवामान अंदाज

पुणे शहर आणि परिसरात पुढील दोन दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहील.मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या भागात आज येलो अलर्ट देण्यात आला आहे.

यंदा राज्यात सरासरीपेक्षा १०२ टक्के जास्त पाऊस

राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील धाराशिव, अहिल्यानगर, जळगाव, सोलापूर, बीड, परभणी या जिल्ह्यात मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. आतापर्यंत ९७५ मिलिमीटर पाऊस झाला असून सरासरी पेक्षा १०२ टक्के जास्त पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी बचाव आणि मदतकार्य अद्याप सुरू आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+