'मराठी लोकांचं वरण भात म्हणजे गरीब शेतकऱ्यांचं जेवण', विवेक अग्निहोत्री हे काय बोलून गेला....
मुंबई: वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असणारे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पुन्हा एकदा एका नव्या वादामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी थेट मराठी खाद्यसंस्कृतीवर टिप्पणी केली आहे. 'वरण-भात' आणि 'कढी' यांसारख्या पदार्थांबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे.

काय म्हणाले विवेक अग्निहोत्री?
विवेक अग्निहोत्री म्हणाले, "मी दिल्लीतून आलो होतो. तिकडे बटर चिकन, कबाब, तंदूरी असे मसालेदार जेवण खाण्याची मला सवय होती. जेव्हा मी इथे आलो, तेव्हा मला वरण भात खाण्यासाठी देण्यात आले. माझे नुकतेच लग्न झाले होते. मी म्हणालो, चला खाऊया वरण भात. त्यानंतर मला कढी खायला दिली. मला वाटले की कढीवर तूप वगैरे असेल, पण मराठी लोकांची कढी तर 'हेल्थ फूड' सारखी होती. मला वाटले की हे तर शेतकऱ्यांसारखं गरीब जेवण करतात."
त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. मराठी खाद्यसंस्कृतीचा अपमान केल्याबद्दल त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
विवेक अग्निहोत्री यांच्याविषयी थोडक्यात
विवेक अग्निहोत्री हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक आहेत. त्यांनी दूरदर्शनवरील मालिकांमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांच्या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये 'चॉकलेट - डीप डार्क सिक्रेट्स' (2005), 'धन धना धन गोल' (2007) आणि 'हेट स्टोरी' (2012) यांचा समावेश आहे. त्यांचा 'द ताश्कंद फाईल्स' (The Tashkent Files) चित्रपट अनपेक्षितपणे यशस्वी ठरला आणि त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला. त्यांच्या 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या अलीकडील चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले. या चित्रपटात 1990 च्या दशकात काश्मिरी पंडितांनी सोसलेल्या हालअपेष्टांचे चित्रण आहे.












Click it and Unblock the Notifications