कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद चावडीवर, विजय वडेट्टीवारांनी केले नाना पटोलेंवर गंभीर आरोप
Vijay Vadettiwar Tarhet on Nana Patole : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उचलबांगडी होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या काँग्रेसच्या गोटात रंगली आहे. तर नाना पटोले यांनी कॉंग्रेस अध्यक्षांना पत्र देऊन मला पदमुक्त करा, अशी मागणी देखील केल्याचे समोर आले. त्यातच आता कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नाना पटोले यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
लोकसभा निवडणुकीतील विजयाचे श्रेय प्रदेशाध्यक्षांना देण्यात आले होते. त्यांच्यावरच विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबादार येईल, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टार्गेट केले.

वडेट्टीवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले होते. त्याचे सर्व श्रेय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतः घेतले होते. त्यामुळे सहाजिकच पराभवाची जबाबदारी त्यांच्यावरच येणार आहे. पराभवाची कारणे, चुका, नेतृत्वाविषयी मत जाणून घेण्यासाठी प्रभारी रमेश चेन्निथाला नागपूरला येणार आहेत. ते सर्वांसोबत चर्चा करतील. या चर्चेतून जो सूर निघेल त्यानुसार पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेणे अपेक्षित आहे.
महाराष्ट्रात कॉंग्रेसचे फक्त 16 आमदार निवडून आले?
प्रभारी यांच्या दौऱ्यात व त्यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीतील चर्चेत चर्चेत कोण सहभागी होतात, काय मत नोंदवतात यावरच सर्व अवलंबून असल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्रात काँग्रेसचे सध्या फक्त 16 आमदार आहेत. त्यांच्या भरोशावर महाराष्ट्रात पुन्हा पक्ष उभारणे, बांधणी करणे मोठे आव्हान आहे.
त्यामुळे पक्षाची धुरा कोणाच्या हातात द्यावी याची चाचपणी व चर्चा होणे आवश्यक असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले. हे सांगताना वडेट्टीवारांचा सर्व रोख आणि रोष प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे होता.
मविआच्या जागावाटपातही पटोलेंचा आडमुठेपणा दिसला
पटोले यांना बदलण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र लोकसभेत मोठे यश मिळाल्याने पटोले यांच्यावरच पक्षश्रेष्ठींनी विश्वास दर्शवला होता. त्यांच्या नेतृत्वात विधानसभेची निवडणूक लढण्याचे निर्देशही राहूल गांधी यांनी दिले होते. दरम्यान महाविकास आघाडीतील जागा वाटपातील वाटाघाटी आणि काही महत्त्वाच्या जागा मित्र पक्षाला सोडण्यात आल्याने राहुल गांधी यांनी पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. नंतरच्या बैठकांची जबाबदारी पटोले यांच्याऐवजी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्यात आली होती. जागावाटपातही












Click it and Unblock the Notifications