आजचा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतीवृष्टी,थापांचा महापूर- उध्दव ठाकरे

मुंबई : आजचा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतीवृष्टी,थापांचा महापूर आहे असल्याची टीका उध्दव ठाकरे यांनी केली आहे. सगळ्याच घटकांना आपल्यासोबत जोडण्याचा हा एक खोटा प्रयत्न आहे. निवडणुका आल्यानंतर अशा काही घोषणा केल्या जातात.

uddhav thackeray

देवेंद्र फडणवीसांच्या भाषेत हे खोटं नरेटिव्ह आहे. या योजनांसाठी आर्थिक तरतूद कशी करणार? याचा त्या कुठेही उल्लेख नाही. त्यांनी आजपर्यंत ज्या घोषणा केल्या, त्यातल्या किती पूर्ण झाल्या, यावर तज्ज्ञांची एक समिती नेमून विधानसभा निवडणुकांच्या आधी त्यावर श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी ही ठाकरे यांनी केली आहे.

मुलगा आणि मुलगी असा भेदभाव नको

"महिलांना जरा मतदानात आपल्या बाजूने करुन घेण्याचा केविलवाना प्रयत्न दिसत आहे. महिलांसाठी लाडकी लेक आणि लाडकी बहीण या योजना आणत असाल तर जरुर आणा. पण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करु नका. मुलींसाठी काही आणत असाल तर मुलांसाठीदेखील काही आणा. त्याबद्दल कुठे वाच्यता नाही", असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शेतक-यांना कर्जमुक्त केलं नाही

"रोजगार वाढीसाठी या अर्थसंकल्पात कुठे काही योजना दिसत नाही. जे काय आहे ते रेटून नेहयचं. मी शेतक-यांना वीज बील माफ करा अशी मागणी केली होती ती त्यांनी मान्य केली. मात्र शेतक-यांना कर्जमुक्त करा ही मागणी सरकारने मान्य केली नाही.राज्यातील जनता विधानसभा निवडणुकांची वाट पाहत आहे.एका बाजूने शेतकऱ्यांना लुटायचं आणि दुसऱ्या बाजूने उदारपणा दाखवायचा. शेतकऱ्यांच्या खतावर 18 % जीएसटी लावला गेलाय", असं उद्धव ठाकरे म्हणाले.

"गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या आश्वासन आणि थापांना कंटाळून चिडलेल्या महाराष्ट्राने जो काही त्यांना दणका दिला त्याने सत्ताधाऱ्यांचे डोळे थोडेसे किलकिले झालेले दिसत आहेत. तरीदेखील जनता त्यांच्या थापांवर विश्वास ठेवेल, असं मला वाटत नाही. महाराष्ट्रातील जनता ही सुजाण, सज्ञान आणि स्वाभिमानी आहे. कितीही फसवण्याचा प्रयत्न केला, तरीदेखील महाराष्ट्र ओरबाडून गुजरातला नेण्याचं षडयंत्र हे उघड झालं आहे. महाराष्ट्र गुजरातच्या पाठी गेलेलं आहे", अशी उद्धव ठाकरे ठाकरे यांनी केली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+