दसरा मेळाव्यात कडाडले अन् आज उद्धव ठाकरे यांना अचानक रुग्णालयात केले दाखल; वाचा नेमकं काय झालंय

Uddhav Thackeray admitted to Hospital : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर एच एन रिलायन्स रुग्णालयात अचानक दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

सोमवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास ठाकरे यांना बरं वाटत नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.एच एन रिलायन्स रुग्णालयामध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांची तपासणी डॉक्टरांकडून केली जात होती. या तपासणी दरम्यान ब्लॉकेज आढळून आल्यानंतर अँजिओग्राफीनंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी देखील ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.

Uddhav Thackeray

2012 मध्ये झाली होती शस्त्रक्रिया?

मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने उद्धव ठाकरे यांना आज सकाळी रिलायन्स रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीअंती हृदयात ब्लॉकेज असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. 2016 मध्ये उद्धव ठाकरे यांना अँजिओग्राफी करून लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. अशीच घटना 20 जुलै 2012 रोजी देखील घडली होती. त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यावेळी त्यांना 8 स्टेंट टाकण्यात आले होते.

दसरा मेळाव्यात कडाडले

दुसरीकडे, दोन दिवसांपूर्वी दसरा मेळाव्यातून घणाघाती प्रहार केला होता. काल सुद्धा त्यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेतून तोफ डागली होती. उद्धव ठाकरे यांनी सत्तेवर येताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा रद्द करू, असे म्हटले आहे. उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपनीला ही निविदा प्राप्त झाली आहे.

मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकार धारावीच्या माध्यमातून मुंबईला लुटण्याचा प्रयत्न करत आहे. अदानींना काय दिले नाही? सारी जमीन अदानींची होत आहे. मुंबई आम्हाला अदानीने दिलेली नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लढून आपण हे साध्य केले आहे. मी स्वतःसाठी लढत नाही. मी मुंबईसाठी लढत आहे. माझे सरकार येताच मी धारावीची निविदा रद्द करेन. तर शेवटच्या श्वासापर्यंत ही मुंबई व महाराष्ट्र मोदी शहांचा होऊ देणार नाही, अशी वल्गना देखील त्यांनी केली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+