वक्फ विधेयकावरुन मविआत बिघाडी, ठाकरेंनी घेतली वेगळी भूमिका; राणे म्हणाले- व्यत्यय आणणे त्यांचे काम

Uddhav Thackeray on Waqf Bill : दोन दिवस वादळी आणि प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर अखेरी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आधी लोकसभेत आणि त्यानंतर राज्यसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सही झाली. त्यामुळे या विधेयकाचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे.

दरम्यान, यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यावर आरोप-प्रत्यारोप सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता वक्फ कायद्यावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांपेक्षा उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता विरोधकाच्या महाविकास आघाडीच्या एकतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे.

Uddhav Thackeray

आप, कॉंग्रेस व एमआयएमची कोर्टात धाव?

वक्फ सुधारणा विधेयकाच्या घटनात्मक वैधतेला आम आदमी पक्षाचे (AAP) आमदार अमानतुल्ला खान यांच्यासह असोसिएशन फॉर दी सिव्हिल राईट्स (APCR) या स्वयंसेवी संस्थेने स्वतंत्र याचिकांद्वारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.

याआधी काँग्रेसने व एआयएमआयचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही सदर विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी न्यायालयात जाणार की नाही यावर आपली भूमिका स्पष्ट केली.

वक्फ कायद्याविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार का?

उद्धव ठाकरे म्हणाले की, वक्फ दुरुस्ती विधेयकावर आम्ही आमची भूमिका मांडली आहे. काँग्रेसला कोर्टात जायचे असेल तर जाऊ द्या. आम्हाला जे सांगायचे होते ते मी सांगितले आहे. यापुढे जशी वेळ येईल, तेव्हा याबाबत बोलत राहीन.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, वक्फ बोर्डाच्या जमिनी घेणार आणि मित्रांना देणार, पुढची पायरी ख्रिश्चन कमिटीकडे असेल. जैन बांधव, हिंदू देवस्थाने यांच्या जमिनीही हे लोक घेतील, हे मी आधीच बोललो होतो. कोणत्याही समाजाबाबत यांना प्रेम नाही. यांचे प्रेम फक्त मित्रांपुरते आहे. आमचा याचमुळे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध केला आहे. तसंच आमची भूमिका आम्ही मांडली आहे. लोकांना तणावग्रस्त आयुष्यात जगायला लावायचं हे यांचे धोरण आहे, असा निशाणा त्यांनी भाजपवर लगावला.

चांगल्या कामात व्यत्यय आणणे हे उद्धव ठाकरेंचे काम- नारायण राणे

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर नारायण राणे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, चांगल्या दिवशी नको त्या माणसाचे नाव घेत आहात. विकास, समृद्धी, लोकहीत हे त्यांचे काम नाही. शिव्या घालणे आणि चांगल्या कामात व्यत्यय आणणे हे उद्धव ठाकरे यांचे काम आहे. म्हणून पक्ष संपत चालला आहे. पुढील निवडणुकीत हा पक्ष राहत नाही. विधायक, सामाजिक, विकासात्मक अशी त्यांची विचारसरणी नाही. मी 39 वर्ष त्यांच्यासोबत काम केले आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हा पक्ष होता, साहेब गेले शिवसेना संपली, या शब्दांत नारायण राणे यांनी टीकास्त्र सोडले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+