Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर निशाणा; व्होट जिहादच्या टीकेवर शेलारांना खरडलं! भावासाठी 'छातीचा कोट!

Uddhav Thackeray Slams BJP & Election Commission : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर अत्यंत कठोर शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. 'व्होट जिहाद'च्या आरोपावरून भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधताना, त्यांनी देवेंद्र फडणवीसांना 'महाराष्ट्राचे पप्पू' ठरवले आहे. तसेच, राज ठाकरे यांच्यावरील भाजपच्या प्रहाराला प्रत्युत्तर देत, ते आपल्या बंधूंच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले आहेत.

मतदार यादीतील 'भूताटकी' आणि 'करप्ट प्रॅक्टिस'वर थेट टीका!

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि मतदार यादीतील कथित गोंधळावर उद्धव ठाकरेंनी तीव्र संशय व्यक्त केला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, 'निवडणूक आयोगाचा सर्व्हर आयोग हाताळत नाही,' असा त्यांना संशय आहे.

ठाकरे यांनी घोषणा केली की, मतदार यादीतील नावे तपासण्यासाठी शिवसेना (UBT) पक्ष शाखेत 'मतदार ओळख केंद्र' सुरू करणार आहे.

'कोणीतरी माझ्या नावाने ॲपमध्ये रजिस्टर केलं आणि ओटीपी वापरून माझे व माझ्या कुटुंबाचे नाव वगळले गेले असते,' असा गंभीर आरोप त्यांनी केला.

Uddhav Thackeray Slams BJP  amp amp  Election Commission

'निवडणूक आयोगाची भूताटकी'

मतदार यादीतील गोंधळ आणि दुबार मतदारांच्या नोंदीच्या संदर्भात त्यांनी 'ही सगळी निवडणूक आयोगाची भूताटकी आहे' असे म्हणत सडकून टीका केली.

सरकारवर आरोप

सरकार झेन-जी ला घाबरत आहे' आणि 'निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस' सुरू आहे, असे सांगत त्यांनी थेट सरकार आणि आयोगावर हल्ला चढवला. त्यांनी मतदारांना त्यांच्या पत्त्यावर दुसरे कोणी मतदार नाहीत ना, याची खात्री करण्याचे आवाहन केले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आणि मदत पॅकेजचा मुद्दा!

खरीप हंगाम आणि कर्जमाफी: 'शेतकऱ्यांचा खरीप हंगाम गेला आहे. आम्ही मोर्चा काढून कर्जमाफीची मागणी केली होती,' असे त्यांनी आठवण करून दिली. केंद्राचे पथक पाहणीसाठी आले आहे, पण 'आता पाहणी कधी करणार आणि प्रस्ताव कधी देणार?' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 'दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पैसे मिळतील' हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले आश्वासन पोकळ ठरले, असे ते म्हणाले.

मराठवाडा दौरा

त्यांनी घोषित केले की, ते मराठवाडा दौरा करणार आहेत. हा दौरा केवळ आगपाखड करण्यासाठी नसून, 'घोषित झालेल्या पॅकेजमधील शेतकऱ्यांना काय मिळाले' आणि 'नेमकं सरकार काय करणार आहे,' हे तपासण्यासाठी असेल.

फडणवीसांना 'पप्पू'ची उपमा

भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर (MVA) 'प्रामाणिक मतदारांची नावे वगळून व्होट जिहादचा डाव रचला' असा गंभीर आरोप केला होता. तसेच, त्यांनी राज ठाकरे यांच्यावरही टीका केली होती. या टीकेला उद्धव ठाकरेंनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले. मी आशिष शेलार यांचं जाहीर अभिनंदन करतो,' असे म्हणत त्यांनी टोला लगावला.

फडणवीसांना 'पप्पू' ठरवले

'आशिष शेलार यांनी नकळतपणे देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलं आहे,' असे ठाकरे म्हणाले. मतचोरीचा मुद्दा फडणवीसांना मान्य नव्हता, पण शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन मतदार यादीत गोंधळ असल्याचे सिद्ध केले.

अंतर्गत वादाचा परिणाम

'आशिष शेलारांनी देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचा पप्पू बोलायचं धाडस दाखवलंय, हा त्यांच्यातील अंतर्गत वादाचा परिणाम असेल,' असा खोचक भाष्य त्यांनी केले.

राज ठाकरेंसाठी 'छातीचा कोट'

'व्होट जिहाद'च्या आरोपांवरून आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला होता. यावर, उद्धव ठाकरे यांनी आपल्या बंधूंसाठी छातीचा कोट होऊन भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ठाकरे बंधू या एकाच मुद्द्यावरून सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्षांवर एकत्र येत जोरदार प्रहार करत असल्याचे यातून दिसून येते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+