विधानसभा निवडणूक एकसंघपणे लढवणार, कुणालाही मुंबईची वाट लावू देणार नाही - उद्धव ठाकरे
मी धारावीच्या विकासाआड कधीही आलेलो नाही. मात्र धारावीतील लोकांना अपात्र ठरवून एका धारावीच्या वीस धारावी करण्याचा सरकारचा डाव असेल तर आम्ही कोणालाही मुंबईची विल्हेवाट लावू देणार नाहीत,असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्या दरम्यान शिंदे सरकारला दिला आहे.
शिवसेना (उबाठा) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस असून या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे हे अनेकांच्या गाठीभेटी घेत आहेत. उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्याचे कारण स्पष्ट केले.

रणनीतीवर चर्चा
लोकसभा निवडणुकीनंतर मी दिल्लीत आलो नव्हतो. खासदारांना घरी भेटलो होतो. दिल्लीत भेटायचे होते. लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची अधिकृत बैठक झालेली नाही. अधिवेशन सुरू असल्याने सर्व नेते इथे आहेत, त्यांना भेटणार आहे. पुढच्या रणनीतीवर चर्चा व्हायला हवी,असे उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले.
त्यापुढे उद्धव ठाकरे म्हणाले, काही दिवसात महाराष्ट्र आणि इतर दोन-तीन राज्याच्याही निवडणुका होणार आहेत त्याही बाबतीत इंडिया आघाडी म्हणून एक संघपणाने लढायला पाहिजे. एकमेकांना सहकार्य आपण कसे देऊ शकतो यावर चर्चा होणे आवश्यक होते म्हणून मी आलो आहे.
माविआ मध्ये कोणीही मोठा भाऊ नाही
महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट मोठा भाऊ असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर पत्रकार उद्धव ठाकरे म्हणाले की ,महाविकास आघाडीत कोणीही मोठा भाऊ नाही. उद्धव ठाकरेंची शिवसेनादेखील मविआत मोठा भाऊ नाही. समसमान जागावाटपावर भर दिला जाणार आहे.जागावाटपावर अद्याप महाविकासआघाडीत चर्चा झालेली नाही. सत्तास्थापन करण्यासाठी महाविकासआघाडी एकमुखानं काम करणार आहे,असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मी धारावीच्या विकासाआड आलो नाही
धारावी बाबत शरद पवारांनीही भूमिका स्पष्ट करावी अशी तुमची मागणी असेल का? असा प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले, कुणी काय भूमिका घ्यावी, त्यापेक्षा माझी भूमिका स्पष्ट आहे. मी धारावीच्या विकासाआड आलेलो नाही. धारावीकरांना तिथल्या तिथे घरे मिळाली.धारावीतील लोकांना अपात्र ठरवून मुंबईत एका धारावीच्या 20 धारावी तयार करण्याचा डाव मिंधे सरकार अदाणीमार्फत करत आहे. ते आम्ही होऊ देणार नाही. मुंबईची विल्हेवाट आम्ही कुणालाही लावू देणार नाही. इतरांची भूमिका काय असेल, हा ज्याचा त्यांचा प्रश्न आहे. शिवसेना मुंबई विल्हेवाट कुणालाही लावू देणार नाही.
केंद्र सरकारने 'त्या' हिंदूंचे रक्षण करावे
बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असतील, तर ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे. आमच्याकडून तिकडे जाऊन काही करू अशी स्थिती नाही. अधिवेशन सुरू आहे. सर्वपक्षीय बैठक माहिती देण्यासाठी होती का? तसे असेल तर त्याला काही अर्थ नाही. केंद्राने ताबडतोब पावले उचलून हिंदूचं रक्षण केले पाहिजे,असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सोनिया गांधींची घेणार भेट
आज बुधवारी उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. अनेक नेत्यांनी ठाकरेंच्या भेटीसाठी हजेरी लावली आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. तर काँग्रेस खासदार कल्याण काळे, याशिवाय समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल यादवांचे पुत्र आणि खासदार आदित्य यादवांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. तसेच, सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि काँग्रेस आमदार विश्वजीत कदम उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचले.
काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मंगळवारी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर आज शरद पवार, शाहू महाराज आणि उद्धव ठाकरेंची भेट होणार आहे. तर उद्या गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता उद्धव ठाकरे सोनिया गांधींची भेट घेणार आहेत.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक











Click it and Unblock the Notifications