प्राणपणाने लढेल पण हा महाराष्ट्र गद्दार, लाचार हरामखोरांचा होऊ देणार नाही - उद्धव ठाकरे
छत्रपती संभाजीनगर : विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राची ओळख इतिहासात काय म्हणून लिहावी ही ठरवणारी लढाई आहे. महाराष्ट्र साधूसंतांचा, शिवरायांचा, विरांचा ही आपली ओळख आहे, ती कायम ठेवणार आहे. प्राणपणाने लढेल पण हा महाराष्ट्र लाचार, गद्दार आणि हरामखोरांचा आपण होऊ देणार नाही.

माझ्या शिवरायांच्या भगव्याला कलंक लागू देणार नाही ही शपथ घेऊन मी आज मैदानात उतरलो असा खणखणीत इशारा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला.छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरे आज (ता. 7) बोलत होते.
ठाकरे म्हणाले, मी आज शिवसेनाप्रमुखाच्या हक्काच्या संभाजीनगरमध्ये आलो आहे. मी मुद्दामहून आलो आहे, कारण गद्दार इथे दुर्दवाने जिकंले त्यांना सांगतो की, विधानसभा निवडणूकीत मी संभाजीनगर जिंकणारच. लोकसभा निवडणुकीत आपला महाराष्ट्रात विजय झाला पण या विजयात संभाजीनगर नाही. ही हक्काची जागा आम्हाला गमवावी लागली. कारणमिंमासा काहीही असेल पण येथे आपण हरलो.
चंद्रकांत खैरे यांनी भगव्याची साथ सोडली नाही. त्यामुळे त्यांच्या निष्ठेचा आदर करत मी त्यांना उमेदवारी दिली होती. मी निवडणूक हरलो तरीही मी यावेळी पुन्हा जिकेल यासाठी मी संभाजीनगरमध्ये आलो आहे. कालची लढाई देशाची, संविधानाची होती. विधानसभेची लढाई ही महाराष्ट्राच्या अस्मितेची ओळख आहे.
सरकारच्या पापाचा घडा भरला
ठाकरे म्हणाले, सरकारने नुसते वीजबील माफ करु नये. शेतकऱ्यांची वीज थकबाकीही माफ करावी. याच अधिवेशनात जुमलेबाज सरकारने शेतकऱ्यांची थकबाकीची रक्कम सरसकट माफ करावी. दामदुपटीने वीजबील या सरकारच्या काळात येत आहे. योजनांची अतिवृष्टी हे सरकार पाडत आहे पण अंमलबजावणी केली जात नाही. या सरकारच्या पापाचा घडा भरला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. आम्ही कर्जमाफी केली ती या सरकारने करुन दाखवली नाही.












Click it and Unblock the Notifications