Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'ठाकरे कुटुंबाचे नाव मतदार यादीतून हटवण्याचा कट'; उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; नेमकं काय घडलं!

Uddhav Thackeray alleges plot to delete Thackeray family names from voter list : मुंबईत झालेल्या 'सत्याच्या मोर्चा'दरम्यान माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना युबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या एका अत्यंत गंभीर आणि अजब प्रकाराची माहिती उघड केली.

केवळ मतदार याद्यांमधील घोळच नाही, तर त्यांचे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबाचे नाव मतदार यादीतून हटवण्यासाठी मोठा कट रचला जात असल्याचा खळबळजनक दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

त्यांच्या या थेट आणि वैयक्तिक अनुभवामुळे मतदार याद्यांच्या पारदर्शकतेबद्दल विरोधकांनी केलेल्या आरोपांना अधिक बळ मिळाल्याचे बोलले जात आहे.

Uddhav Thackeray

'सत्याच्या मोर्चात' वैचारिक एकजूट

मतदार याद्यांमधील कथित घोळ आणि मतचोरीविरोधात १ नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडी (मविआ) आणि मनसेच्या वतीने 'सत्याचा मोर्चा' आयोजित करण्यात आला होता. या मोर्चात वैचारिक मतभेद विसरून सर्व विरोधी पक्षनेते एकत्र आले. या सर्वांनी एकमुखाने मागणी केली की, "मतदार याद्या अगोदर स्वच्छ करा. मतदार याद्यातील घोळ मिटवा, नंतरच निवडणूक घ्या." यावेळी राज ठाकरे यांनी दुबार मतदारांचे कागदपत्रे सादर करून पुराव्याचे महत्त्व स्पष्ट केले, तर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रकार सांगून कटाचा पर्दाफाश केला.

उद्धव ठाकरेंचा नेमका दावा काय?

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी मतचोरी होत असल्याचा गंभीर आरोप केला. अनेक मतदारांची नावे दोन ठिकाणी आहेत, पत्ता व्यवस्थित नाही, तर काहींचे नाव चुकीचे आहे, असा त्यांचा दावा होता. हे सांगताना त्यांनी आपल्या कुटुंबासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, "दोन दिवसांपूर्वी 'मातोश्री'वर निवडणूक आयोगाची माणसे आली होती," असे ठाकरे यांनी सांगितले. त्यांनी प्रतिनिधींना बोलावून विचारले असता, त्यांना सांगण्यात आले की, त्यांच्या मतदार नोंदीमध्ये दिलेला टेलिफोन नंबर खोटा आहे. ठाकरे यांनी पक्षाचे नेते अनिल परब, अनिल देसाई यांना विचारले असता, त्यांनी कोणीही निवडणूक आयोगाकडे अर्ज केला नसल्याचे स्पष्ट झाले. ठाकरे यांच्या नावाने २३ तारखेला (ऑक्टोबर) एका 'सक्षम' नावाच्या ॲपवरून अर्ज करण्यात आला होता.

नाव बाद करण्याचा मोठा डाव!

उद्धव ठाकरे यांनी या घटनेचा अर्थ स्पष्ट करताना सांगितले की, यामागे मोठे कारस्थान दडलेले आहे. "माझ्या नावाने खोट्या मोबाईल क्रमांकाच्या मदतीने ओटीपी काढण्याचा प्रयत्न झाला. कदाचित १४ किंवा १५ तारखेला हे काम केलं गेलं. म्हणजे माझ्यासकट घरातील चारही लोकांची नावे मतदार यादीतून बाद करण्याचा हा डाव आहे."

उद्धव ठाकरे यांनी हा प्रकार अत्यंत गंभीर असून, हे कृत्य कोणी केले, याचा तातडीने शोध घेतला पाहिजे, अशी मागणी केली. ते म्हणाले, "मी पक्षाचा प्रमुख आहे. आम्हाला या गोष्टी नाही कळत?" असा हल्लाबोल करत त्यांनी लोकशाही प्रक्रियेतील पारदर्शकतेवर शंका उपस्थित केली.

माजी मुख्यमंत्र्याच्या नावावर आणि कुटुंबाच्या मतदानाचे हक्क हिरावून घेण्यासाठी खोटा अर्ज केला जाणे, ही घटना लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेतील सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते. निवडणूक आयोगाची माणसे थेट 'मातोश्री'वर येऊन चौकशी करेपर्यंत हा प्रकार कोणालाही कळला नसता.

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या खळबळजनक दाव्यामुळे, विरोधकांनी मतदार याद्यांमधील घोळाबद्दल आणि 'मतचोरी'बद्दल जे आरोप केले आहेत, त्यांना एका मोठ्या कटाच्या दिशेने बळ मिळाले आहे.

निवडणूक आयोगाने आता या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, उच्च-स्तरीय आणि निःपक्षपाती तपास करणे आवश्यक आहे, जेणेकरून जनतेचा लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास कायम राहील.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+