राहुल सोलापूरकर सारख्या विकृत माणसाला गोळ्या घातल्या पाहिजे...उदयनराजे भोसलेंनी व्यक्त केला संताप

ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या विधानानंतर एकच चर्चा सुरु झाली. अनेकांनी टिका केल्यानंतर सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल सोलापूरकर यांना गोळ्या घातल्या पाहिजेत. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असे विधान केले.

Udayanraje Bhorle

नेमके काय होते प्रकरण?

राहुल सोलापूरकर यांनी एका यूट्यूब चॅनलवरच्या मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बोलताना म्हणाले की, महाराज आग्र्याहून सुटले ते मिठाईचे पेटारे वगैरे काही नव्हते. महाराज चक्क लाच देऊन आले आहेत. त्यासाठी किती हुंड्या सोडवल्या याचे पुरावे आहेत. औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोलाही लाच दिली गेली. स्वामी परमानंद शेवटचे पाच हत्ती घेऊन गेले त्याच्या परवान्याची खूणही आहे. गोष्टी रुपात करताना ते रंजक करुन सांगितले गेले. त्यामुळे खरा इतिहास लोकांसमोर जात नाही."

विधानानंतर वाद वाढला

राहुल सोलापूरकर यांच्या विधानाचे पडसाद महाराष्ट्रभर पडले. भाजपने आंदोलने केली. शिवसेना ठाकरे गटानेही आंदोलन केले. हा वाद वाढल्यानंतर राहुल सोलापूरकर यांनी या विधानाबद्दल दिलगीरी व्यक्त केली. आता भाजपचे खा. उदयनराजे भोसले यांनीही पत्रकार परिषद घेत, सोलापूरकर यांच्याबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

उदयनराजेंचा संताप

खा. उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, "राहुल सोलापूरसारख्या व्यक्तीची जीभ हासडली पाहीजे. महापुरुषांबाबत जे अवमानकारक विधाने करतात त्यांना जनतेने ठेचले पाहीजे. महापुरुषांबाबत बोलणाऱ्या विकृतांमध्ये वाढ झाली तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होऊ शकतो. या अगोदरही आम्ही केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी केली होती की, अशी विधाने करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. त्यांच्यावर देशद्रोहाचा कायद्यानुसार कारवाई करावी. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण जपले नाहीत, तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही.", असे मत उदयनराजे यांनी व्यक्त केले.

गोळ्या झाडल्या पाहिजे

उदयनराजेंचा बोलताना प्रचंड संताप झाला. ते म्हणाले, विकृत विधाने करणाऱ्या व्यक्तीचे चित्रपट किंवा ते जिथे जिथे अभिनय करत असतील, ते ते हाणून पाडले पाहीजे. चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही अशा लोकांना थारा दिला नाही पाहीजे. या लोकांना गाडले गेले नाही तर देशाच्या अखंडतेसमोर धोका निर्माण होईल. मी तर म्हणतो अशा विकृतांना सरळ गोळ्याच झाडल्या पाहिजेत, अशीही संतप्त प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+