"मशाल घराघरात आग लावणारी, समाजासमाजात द्वेष निर्माण करणारी!"

UBTs election symbol Mashal sets fire to homes : शिवसेना कुणाची हे आता कुणालाच वेगळे सांगण्याची गरज नाही. कारण शिवसेनेचा वारसा शिवसेनेचे खरे धुरंधुर आणि खंदे नेतेच चालवत आहेत. ज्यांना खुद्द बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आहे. काँग्रेसच्या दावणीला धनुष्यबाण बांधण्याचे काम करणाऱ्यांना उठाव करुन एकनाथ शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले आणि बाळासाहेबांच्या धनुष्यबाणाचा स्वाभिमान कायम ठेवला. धनुष्यबाण आणि शिवसेना आमची म्हणणाऱ्यांना एकनाथ शिंदे यांनी धाराशीव जिल्ह्यातील परांडा येथे झालेल्या सभेत सडेतोड उत्तर दिले.

"शिवसेना आमची म्हणणाऱ्यांनी मशाल विकून टाकली. ती मशाल क्रांतीची मशाल नाही, ती घराघराला पेटवणारी, आग लावणारी समाजासमाजात द्वेष निर्माण करणारी मशाल आहे आणि येत्या 20 नोव्हेंबरला मशाल विझणार आहे," हे भाकित केले हे भाकित आता खरे ठरण्याची चिन्हे असल्याचे दिसून येत आहे.

UBTs election symbol Mashal sets fire to homes

शिवसेनेसाठी धनुष्यबाण आण-बाण आणि शान

परांडा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण आमचा म्हणणाऱ्यांवर जोरदार टीका केली. "अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ" असा त्यांचा स्वभाव असल्याचे ते म्हणाले होते.त्यांनी या सभेत शिवसेनेच्या वाट्याला जाणाऱ्यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले. बाळासाहेबांनी कमावलेल्या धनुष्यबाणाची जबाबदारी आपल्यावर दिली आहे म्हणजेच एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेवर दिली आहे. बाळासाहेबांनी कमावलेली शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली तो दिवस या महाराष्ट्रातील सर्वात दुर्दैवी दिवस होता, असेही ते म्हणाले.

'बाळासाहेबांचे विचार विकायला निघाले'

बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विकायला निघाले त्यावेळीच आम्ही उठाव करण्याचं धाडस केलं. तानाजी सावंत त्यावेळी माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे होते. बाळासाहेबांनी कमावलेल्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाची आण बान शान नियतीने आपल्यावर सोपवली आहे. तसंच उस्मानाबादच नामकरण धाराशिव करण्याच भाग्य मला मिळालं. पूर्ण बहुमताचं सरकार आणल्यानंतर उस्मानाबादच धाराशिव आणि औरंगाबादच छञपती संभाजीनगर नामकरण करून बाळासाहेबाचं स्वप्न पूर्ण केलं आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात जेही बालेकिल्ले आहेत ते धनुष्यबाणांचे आहेत शिवसेनेचे आहे. ज्यांच्याकडे धनुष्यबाण तीच शिवसेना खरी आणि ती एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.

..म्हणून एकनाथ शिंदे यांनी केला उठाव

शिवसेना संपवायला, शिवसेनेचे खच्चीकरण करण्यासाठी आणि बाळासाहेबांचे विचार विकायला उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष निघाला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी उठाव करण्याचे धाडस केले. सर्वसामान्य लोकांचे सरकार महायुतीचे सरकार राज्यात आपण आणले आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे, आनंद दिघेंच्या विचारांचे सरकार राज्यात आले.

दूध का दूध पाणी का पाणी

अडीच वर्षात महायुतीने केलेली कामे आधी बघायला हवी आणि मग ठरवायला हवे. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊद्या असे आव्हानच एकनाथ शिंदे यांनी धाराशीवच्या सभेत बोलताना दिले आहे. एकीकडे महाविकास आघाडी सरकारने योजनांचा गवगवा केला आणि ज्या युती सरकारच्या योजना होत्या त्या बंद पाडल्या. याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आणि त्यांचे सरकारही कोसळले. ज्या सरकारने जनतेसाठी खरेच काम केले होते ते सरकार पुन्हा आले आणि ते महायुतीचे सरकार होते. या सरकारने सर्व योजनांना नवसंजीवनी दिली. इतकेच नव्हे तर त्या योजनांची फळ तळागळापर्यंत जनसामान्यांपर्यंत पोहचवली हे महायुतीतील नव्हे तर खुद्द जनताच सांगते.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक योजना बंद

महायुती सरकारने रिपोर्ट कार्ड सादर केला. अडीच वर्षांचा आम्ही हिशोब त्यांनी दिला. हे रिपोर्ट कार्ड सादर करायला हिंमत आणि धाडस लागते असे खुद्द एकनाथ शिंदे हे म्हणाले होते. काम करणे, प्रकल्पाला चालना देण्याचे काम महायुती सरकारच्या काळात होत आहे पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रकल्प बंद केले जात होते. जलयुक्तशिवार योजना, बंद, मेट्रो बंद, समृद्धी बंद सर्व योजना बंद केल्या जात होत्या.

मराठवाडा वाॅटरग्रीड योजनाही बंद केली होती. आता महायुती सरकारने आशेचा किरण दाखवत मराठवाडा सुजलाम् सुफलाम् करण्याचे धोरण राबवले आहे. यातून मराठवाड्याला श्वाश्वत पाणी मिळणार आहे आणि येथील जनजीवन आर्थिकदृष्ट्या गतीमान होईल.

एकनाथ शिंदे यांचे सरकार देना बँक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात अनेक योजना आणल्या. विकासकामे केली त्यातच जे जे करता येईल ते सर्व त्यांनी जनतेसाठी केले. अतिवृष्टीग्रस्तांच्या शेतबांधावर गेले, शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेतले. त्यांना मायेची ऊब दिली आणि त्यांना मोलाचे सहकार्य केले. नुकसान भरपाई देत त्यांच्या जीवनात आशेचे किरणं आणली. या सरकारमुळे हे शक्य झाले. कारण एकनाथ शिंदे हे देणारे आहेत घेणारे नाहीत. त्यांनी याबाबत काही उदाहरणेही दिली आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+