Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

तुकाराम बीज 2025:एकनाथ शिंदे यांना संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान; वारकऱ्यांना दिला 'हा' शब्द

पुण्यातील देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या बीज यात्रेनिमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रविवारी पहिला "संत तुकाराम महाराज पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार माझा नाही तर, माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचा आहे. या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Eknath Shinde awarded Sant Tukaram Maharaj Award

तुकाराम बीजेनिमित्त देहूत गर्दी

तुकाराम बिजेनिमित्त आज देहूत लाखो वारकरी दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांना पहिला संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तुकोबांची पगडी, शाल, श्रीफळ, पुष्पहार, चिपळ्या, संत तुकाराम महाराजांची मुर्ती, संत गाथा आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. या पुरस्कारानंतर एकनाथ शिंदे यांनी आयोजकांचे व सर्व वारकऱ्यांचे आभार मानले.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

पुरस्कारानंतर एकनाथ शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, हा पुरस्कार मिळाल्यानंतर माझ्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. मी खूप भाग्यवान आहे की मला हा पुरस्कार त्याच भूमीवर मिळत आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज भेटले होते. महाराष्ट्र ही संतांची व शूरविरांची भूमी आहे. महाराष्ट्राच्या संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असा शब्दही एकनाथ शिंदे यांनी दिला.

कशासाठी दिला पुरस्कार?

पंढरपूर वारीदरम्यान त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांच्या सेवा-सुविधांसाठी घेतलेल्या विशेष प्रयत्नांसाठी हा पुरस्कार देण्यात आला. निर्मल वारी, हरीत वारी ही संकल्पनाही त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष आमलात आणली होती. या सर्व योगदानाची दखल घेऊन एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+