Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ईव्हीएमवर आक्षेप घेण्यासारखं काही नाहीच; सुप्रीम कोर्टाने पुन्हा खडसावलं

Supreme Court decision- नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दिमाखदार यश मिळवले. त्याऊलट महाविकास आघाडीचा दारून पराभव झाला. त्यानंतर ईव्हीएम मशिनवर सातत्याने आरोप सुरु आहेत. या दरम्यान डॉ. के.ए पॉल यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. पण सुप्रीम कोर्टाने ती याचिका फेटाळली आहे.

Supreme Court

काय होती याचिका?

डॉ. के.ए पॉल यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. ईव्हीएम मशिनवर विरोधकांकडून सातत्याने संशय व्यक्त केला जात आहे. आरोपात महाविकास आघाडीचे नेतेही सहभागी आहेत. ईव्हीएममध्ये घोळ करुनच महायुतीने निवडणूक जिंकली, अशी तक्रार महाविकास आघाडीकडून होत आहे. त्यामुळे डाँ. पाँल यांच्या याचिकेकडे लक्ष लागले होते. मात्र आता सुप्रीम कोर्टाने ती याचिका फेटाळली आहे.

काय म्हणतंय सुप्रीम कोर्ट ?

सुप्रीम कोर्टाने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची याचिका फेटाळली आहे. पराभव झाला तर ईव्हीएममध्ये बिघाड आणि निवडणूक जिंकली, तर ते यश असं कसं होऊ शकतं? असा सवाल सुप्रीम कोर्टाने केला आहे. मतदारांना प्रलोभन दाखवताना पैसे, दारू किंवा अन्य वस्तूंचे वाटप केल्यास उमेदवाराला पाच वर्ष निवडणूक लढवण्यावर बंदी असेल, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. याचिकाकर्ता डॉ. के.ए पॉल आणि महाविकास आघाडीचा कोणताही संबंध नसल्याची माहितीही आता समोर येत आहे.

आव्हाडांनीही केला होता आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर त्यांनी मीडियाशी संपर्क साधला. ते म्हणाले, "ईव्हीएम विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. मात्र पुण्यातील प्रकार धक्कादायक होता. पुण्यातील एका मतदारसंघात 3,65,000 इतकं मतदान झालं. पण मतमोजणी 3,74,547 इतक्या मतांची झाली. याचाच अर्थ, मतदानापेक्षा जास्त मोजणी झालेले 9 हजारपेक्षा मतदान आले कोठून..? याचा अर्थ हे मॅनूप्लेशन आहे, असा आरोपही आव्हाडांनी केला होता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+