आजपासून विधिमंडळाच पावसाळी अधिवेशन, मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजणार
आज २७ जूनपासून राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनला सुरूवात होत आहे. या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण वाद, पुणे ड्रग्ज, सीईटी घोळ यावर सरकारला घेरण्यासाठी विरोधक तयार आहेत. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यंदाच्या अधिवेशनात गाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, 14 व्या विधानसभेचं हे शेवटचं अधिवेशन आहे. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत महाविकासआघाडीला मिळालेल घवघवीत यश पाहता आजपासून सुरू होणारं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सरकारच्या वतीनं अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे.

महायुती सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प
दरम्यान, 18व्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारी महिन्यात पार पडले होते. या अधिवेशनात एप्रिल ते जुलै 2024 या 4 महिन्यांसाठी लेखानुदान मांडून ते मंजूर करण्यात आले होते.
त्यामुळे आता या अधिवेशनात 2024-25 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे महायुती सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत
विधानसभेच्या तोंडावर मोठ्या घोषणांची शक्यता
लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला होता. यामध्ये महाविकास आघाडीने मोठी मुसंडी मारली होती. लोकसभेतील विजयामुळे विरोधकांचा आत्मविश्वास दुप्पट झाला आहे. तर भाजपला कमी जागा मिळाल्या. तसेच महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक येत्या ऑक्टोबरमध्ये होणार आहेत.
त्याची घोषणा सप्टेंबरच्या मध्यात होण्याची दाट शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर जनतेतील हरवलेला विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी सरकारकडून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे या अधिवेशनात शेतकरी, महिला, युवक, कामगार तसेच विविध दुर्बल घटकांसाठी योजनांची जंत्री मांडली जाण्याची शक्यता आहे.
राज्यात आधीच वातावरण तापलेलं
खरे तर राज्यात अनेक प्रश्नांवरून सध्या वातावरण तापलेले आहे. मुख्य म्हणजे ओबीसी- मराठा आरक्षणावरून राज्यात मोठा संघर्ष निर्माण झालेला आहे. त्यातच कापूस, सोयाबीनचे कोसळलेले भाव, कांदा प्रश्नावर सरकारने केलेली पोकळ घोषणाबाजी, शेतकरी कर्जमाफी, दूधाचे दर, शक्तीपीठ महामार्गाला शेतक-यांचा विरोध, लांबलेला पाऊस व दुष्काळ सदृश्य परिस्थिती अशा विविध मुद्यांवर विरोधक घेरणार असल्यामुळे सरकारचा कस लागणार आहे.
महाविकासआघाडी सरकारला घेरणार
या सर्व प्रश्नांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. राज्यात घडलेल्या अनेक घटनांवरून याआधीच विरोध पक्षातील नेत्यांनी पावसाळी अधिवेशनात हे प्रश्न मांडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेसला मागील 2 निवडणुकीमध्ये मिळालेल्या कमी जागांमुळे भाजपकडून त्यांना सातत्याने हिणवले जात होते.
मात्र आता या अधिवेशनात काँग्रेस भाजपविरोधात आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लोकसभेची निवडणूक एकदिलाने लढल्याने ही एकजूट अधिवेशनातही दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारची डोकेदुखी आणखीनच वाढणार आहे.
-
विश्वविजेत्या इंडियाचे 'बाप्पा'ला साकडे! सिद्धिविनायकाच्या चरणी T20 वर्ल्डकप ट्रॉफीसह गंभीर-सूर्या! -
आजचे राशीभविष्य: सोमवार १६ मार्च २०२६, 'या' राशींना होणार प्रचंड धनलाभ; पाहा तुमची रास! -
अदानी समूहाचा मोठा निर्णय: देशात उभारणार 300 शाळा, 30 रुग्णालये; 60 हजार कोटींची गुंतवणूक -
Eid ul fitr 2026 wishes marathi hindi: इदनिमित्त खास मराठी-हिंदी 20 शुभेच्छा संदेश वाचा आणि शेअर करा -
Devendra Fadnavis : गॅस टंचाईची भीती हा काँग्रेसचा कुटील डाव; देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती आरोप -
आजचे राशिभविष्य 15 मार्च 2026 : 'या' राशींच्या नशिबात राजयोग! कोणाला मिळणार पैसा आणि कोणाला यश? वाचा -
IPL 2026 : मैदानावरचा शेवटचा 'हेलिकॉप्टर शॉट'? आयपीएलनंतर धोनीसह 'हे' 5 दिग्गज घेणार निवृत्ती -
अदानी टोटल गॅसकडून औद्योगिक ग्राहकांसाठी अतिरिक्त नैसर्गिक वायूच्या दरात कपात -
इराण-इस्त्रायल युद्धावर RSSने मांडली भूमिका; सरकार्यवाह होसबळे यांनी मोदी सरकारचे केले समर्थन! -
29 वर्षांपूर्वीची दुखापत अन् सक्तीची विश्रांती; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवर शस्त्रक्रिया! -
Baramati Bypoll 2026 : सुनेत्रा पवार रिंगणात, पण 'बिनविरोध'ची शक्यता धूसर? जाणून घ्या नेमकं समीकरण -
चांदीच्या दरात मोठी घसरण! इराण युद्धाच्या सावलीत किमती कोसळल्या; जाणून घ्या आजचे ताजे दर!







Click it and Unblock the Notifications