केंद्रीय निवडणूक आयोगाने उचलले मोठे पाऊल; 'या' दिवशी मविआच्या नेत्यांना बोलावले चर्चेला
विधानसभा निवडणुकीत महायुतीने अभूतपूर्व यश मिळवले. निकालानंतर महाविकास आघाडीने ईव्हीएम मशिनसह अनेक मुद्यांवर प्रश्न उपस्थित केले होते. राज्य निवडणूक आयोगाने या प्रश्नांची उत्तरे दिली, मात्र मविआचे समाधान झालेले नव्हते. आता थेट केंद्रीय निवडणूक आयोगाने या प्रकरणात लक्ष घातले असून, महाविकास आघाडीच्या नेत्यांना चर्चेसाठी आमंत्रण दिले आहे.

मविआने घेतली होती शंका
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठा फेरफार झाल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून सातत्याने केला जात आहे. ईव्हीएम आणि राज्यात वाढलेल्या मतदानाविरोधात महाविकास आघाडीकडून सातत्याने वक्तव्य केली जात आहे. तसेच अनेक ठिकाणी आंदोलन केले जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात वक्तव्य केले होते. शरद पवार यांनही शनिवारी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली. ईव्हीएम हॅक केले जावू शकते, यावर आता शंका येऊ लागली आहे, असे शरद पवारांनी म्हटले होते.
निवडणूक आयोगाने दिले होते उत्तर
या सर्व प्रश्नांची उत्तरे राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वीच दिली होती. मात्र त्यानंतरही मविआचे आरोप थांबले नाहीत. ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांनी याविरोधात पुण्यातील फुले वाड्यात आंदोलनही सुरु केले. या सर्व प्रकरणानंतर आता थेट केंद्रीय निवडणूक आयोगाने या प्रश्नात लक्ष घालत, आरोप करणाऱ्या नेत्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे.
कधी होणार बैठक?
राज्य निवडणूक आयोगाने मविआच्या शंकांचे निरासन केल्यानंतरही याबाबतच्या चर्चा थांबल्या नाहीत. राज्य निवडणूक आयोगाने मविआचे सर्व आरोप फेटाळले होते. त्यानंतर महाविकास आघाडीने भूमिका बदलली नाही. त्यामुळे आता थेट केंद्रीय निवडणूक आयोगाने विरोधकांना चर्चेसाठी बोलवले आहे. तुमच्या शंकांचे निरासन करण्यासाठी ३ डिसेंबर रोजी चर्चेसाठी येण्याचे निमंत्रण केंद्रीय निवडणूक आयोगाने महाविकास आघाडी आणि मतदान प्रक्रियेवर शंका उपस्थित करणाऱ्या विरोधकांना दिले आहे. या चर्चेनंतर विरोधक काय भूमिका मांडतात? याकडे देशाचे लक्ष लागले आहे. आयोगाकडून काँग्रेसला सर्व कायदेशीर समस्यांचे निरसन केले जाईल, असे आश्वासन दिले आहे.












Click it and Unblock the Notifications