ज्योतिर्मठ शंकराचार्य म्हणतात, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनत नाहीत तोपर्यंत..

ज्योतिर्मठ शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी त्यांची पाद्यपूजा केली. आदित्य आणि तेजस हे दोन्ही ठाकरे सुपुत्र यावेळी उपस्थित होते. दरम्यान या भेटीनंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

पाद्यपूजा झाल्यानंतर अविमुक्तेश्वरानंद यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आम्ही सार्वजन सनातन धर्माचे अनुयायी आहोत. आमच्या धर्मात पाप आणि पुण्य यांनी स्पष्ट शब्दात व्याख्या केली आहे. विश्वासघात हे सर्वात मोठे पाप आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी विश्वासघात झाला आहे. त्यांच्याशी झालेल्या विश्वासघातामुळे आम्ही व्यथित आहोत.

swami avimukteswaranand saraswati meet uddhav thackeray

ते पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनत नाहीत तोपर्यंत आमच्या वेदना शमणार नाहीत. फसवणूक करणारी व्यक्ती कधीही हिंदू होऊ शकत नाही. उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत जे घडले त्यामुळे महाराष्टार्तील जनता व्यथित झाली आहे आणि निवडणुकांत देखील ते दिसून आले आहे.

ज्या जनतेने आपला नेता निवडला त्या जनमताचा हा अनादर आहे. मध्ये सरकार पाडणे चुकीचे आहे आणि जनतेच्या मताची ती चेष्टा आहे, असे अविमुक्तेश्वरानंद म्हणालेत.

संजय निरुपम यांची टीका

त्यांच्या या प्रतिक्रियेवरून समर्थनात आणि विरोधात प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद हे धार्मिक कमी आणि राजकारणी जास्त आहेत. उबाठा प्रमुखांची भेट घेणे हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे.

त्यावर कुणीही आक्षेप घेण्याचे काहीही कारण नाही. मात्र शिवसेनेच्या अंतर्गत वादावर भाष्य करणे त्यांनी टाळायला हवे होते. राजकीय वक्तव्ये त्यांना शोभा देत नाहीत. मुख्यमंत्री कुणी बनावे आणि कुणी नाही हा जनतेचा निर्णय आहे, शंकराचार्यांचा नाही. बोलता बोलता स्वामीही असेही म्हणाले आहेत की विश्वासघात करतात ते हिंदू असू शकत नाहीत. हा विचित्र तर्क आहे.

आधी हा निर्णय व्हायला हावा की नेमका विश्वासघात कुणी केला ?आणि हा निर्णय शंकराचार्य घेऊ शकत नाहीत. आणि दुसरे म्हणजे हिंदू पौराणिक कथांमध्ये विश्वासघाताची अनेक प्रकरणे उपलब्ध आहेत. ते काय हिंदू नाहीत का ? असा सवाल निरुपम यांनी केला. विश्वासघात हा मानवी गुण आहे. त्याचे कोणत्याही धर्माशी काहीही देणेघेणे नाही.

हा, त्या अवगुनामुळे व्यक्ती चांगला किंवा वाईट हिंदू ठरू शकते, मात्र तो हिंदूच नाही, या तर्काला आधार नाही असे निरुपम म्हणाले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+