सुषमा अंधारेंनी पंकजा मुंडे, प्रीतम मुंडेंवर डागली तोफ; नेमकं काय म्हणाल्या अंधारे?
Mumbai: लोकसभा निवडणुकीत बीडचा धक्कादायक निकाल समोर आला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा 8 हजारहून अधिक मतांनी प्रभाव केला. त्यानंतर पंकजा मुंडे समर्थकांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही बीड जिल्ह्यात घडल्या.
दुसरीकडे पंकजा मुंडेना मराठा समाजाने धडा शिकवल्याची चर्चाही बीडच्या राजकारणात सुरू होती. आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

बीडच्या विकासाचा मुद्दा
यंदाची लोकसभा निवडणूक जातीवादावर नाही तर विकासावर लढली गेली, स्थानिक प्रश्नांवर लढली गेली असे सुषमा अंधारे यांनी म्हटलं. मतदान केलंच नाही, परळीत आणि बीडमध्ये विकास झाला का? जी माणसं असं म्हणतात पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या तर फार विकास झाला असता, आत्तापर्यंत त्यांचा कोणी हात धरला होता का? असं म्हणत सुषमा अंधारेंनी पंकजा मुंडेंना टोला लगावला आहे.
ओबीसी-मराठा संघर्षामागे राजकारण
ओबीसी आणि मराठा समाज गुण्यागोविंदानं राहणारे लोक आहेत. आडून राजकीय नेते आपली राजकीय पोळी भाजत आहे, असं अंधारे म्हणाल्या. आष्टी, पाटोदा या ठिकाणच्या मतदारांनी पंकजा मुंडे यांना मतदान केलंच नाही, त्यामुळे निष्कारण त्याला जातीवादाचं रूप देणं चुकीचं असल्याचही अंधारे यांनी म्हटलं आहे.
सुरेश कुटे प्रकरणावर भाष्य
दरम्यान, सुषमा अंधारे यांनी बीडमध्ये गाजत असलेल्या सुरेश कुटे प्रकरणावर भाष्य केलं. त्या म्हणाल्या, सुरेश कुटे यांनी किती लोकांना लुटून खाल्लं? प्रीतम मुंडे का बोलल्या नाहीत? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला. सुषमा अंधारे म्हणाल्या की, "ज्या ऊसतोड कामगारांच्या जीवावर तुम्हाला वर्षानुवर्ष गलिच्छ राजकारण करत आलात, त्या लोकांना हे माहितीच नाही हे कोण बोलणार आहे.
इथल्या मल्टीस्टेट वाल्यांनी बीडकरांना लुटून खाल्लं आहे, सुरेश कुटे यांनी किती लोकांना लुटून खाल्लं? यावर मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिलं. राजकीय प्रतिनिधी म्हणून प्रीतम मुंडे का बोलल्या नाहीत? तर कुटे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हातून गळ्यात स्कार्फ टाकून घेतला म्हणून? का त्यावर प्रश्न विचारले गेले नाहीत? असे प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केले.
मोदींच्या सभेमुळे पंकजांचा पराभव
पुढे बोलताना पंकजा मुंडे यांचा पराभव भाजपच्या प्रचार पद्धतीमुळे झाला, असे अंधारे म्हणाल्या. मोदी यांची सभा पंकजा मुंडे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली, हे मान्य केलं जात नाही. पंकजा मुंडे यांनी आपल्या पराभवाचं खापर मराठा किंवा ओबीसी, जातींवर फोडण्यापेक्षा आपल्या नेत्यांचा का? विचार करत नाहीत.
मोदीजी सभेत डायरेक्ट इथल्या मुस्लिम समाजाबाबत बोलले होते. मोदी यांनी जातीवादी भाषण केलं. जाती समूह बदनाम करणं हे थांबवणं गरजेचं आहे. सरकारने समन्वय साधावा, असं देखील अंधारे म्हणाल्या.












Click it and Unblock the Notifications