Nagpur Hit And Run : ठाकरेंची वाघिण कडाडली; संकेत बावनकुळेच्या तपासावरून अंधारेंचे पोलिसांना प्रश्न
Sushma Andhare on Nagpur Hit And Run : नागपुरात झालेल्या हिट अॅण्ड रन प्रकरणावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले दिसत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पहाटेच या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांना टारगेट केले. त्यानंतर ठाकरेंच्या शिलेदार उपनेत्या सुषमा अंधारे यांनी थेट नागपूर गाठून या प्रकरणावरून पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
नागपुरमध्ये झालेल्या संकेत बावनकुळे यांच्या ऑडी कार अपघाताच्या घटनेवरुन शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नागपुरात जाऊन सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी नागपूर पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.अपघात झाल्यानंतर संकेत बावनकुळेची ऑडी कार गॅरेजमध्ये का नेली? गाडीच्या नंबरच्या एफआयआरमध्ये नोंद का करण्यात आली नाही? संकेत बावनकुळे याचे या प्रकरणी मेडिकल का करण्यात आले नाही? असे विविध प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

बेगडी हिंदूत्व, भाजप नेत्याच्या मुलाने बीफ खाल्ले
बेगडी हिंदुत्व असणाऱ्या लोकांना माहिती असायला हवे म्हणून सांगते की भाजप नेत्याच्या मुलाने बीफ खाल्ले आणि त्यानंतर मानकापूरमध्ये पहिली धडक दिली. त्या ठिकाणी अपहरणाचा बराच ड्रामा झाला, यावेळी लोकांनी संकेत बावनकुळेंसह त्यांच्या मित्रांना बराच चोप दिला. त्यांना पोलीस ठाण्यात आणायचा प्रयत्न केला, असा दावाही अंधारे यांनी केला आहे, मला पीआय चकाटे आणि डीसीपी मदने यांनी माहिती दिली, पण ही माहिती संपूर्ण दिलेली नाही, असेही अंधारे म्हणाल्या.
संकेत बावनकुळे वर गुन्हा कधी दाखल करणार? @cbawankule @Dev_Fadnavis @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm pic.twitter.com/mM50hfQpIQ
— SushmaTai Andhare (@andharesushama) September 10, 2024
पोलिस सुरक्षेची खात्री देणार?
सुषमा अंधारे म्हणाल्या की, जितेंद्र सोनकांबळे वर दबाव आणायचा प्रयत्न सुरू आहे.तो अनुसूचित जातीतील असल्याने त्यांच्या जीवाची मला काळजी वाटते आहे. पोलिस त्यांच्या सुरक्षेची खात्री देतील का?, बावनकुळे म्हणतात तसे निपक्ष तपास होणार का, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.
विकास ठाकरेंना 24 तासानंतर जाग
नागपुरातील कॉंग्रेस आमदार विकास ठाकरे यांच्या वक्तव्यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, नेत्यांच्या मुलांसाठी संस्कार वर्गच उघडायला हवे. विकास ठाकरेंचा सल्ला हा पोर्शे प्रकरणात निबंध लिहून घेतल्यासारखाच आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. निबंध लिहला की संपला विषय, अशी प्रथा जर पडली तर अवघड होईल. हिट ॲन्ड रन कायदा हा सत्ताधाऱ्यासाठी नाही फक्त विरोधक आणि गरीबांसाठी केला आहे, असे सभागृहात नमूद केले पाहिजे. विकास ठाकरे या प्रकरणावर आता चोवीस तासानंतर बोलत आहे, हे देखील नवलच आहे.
अंधारे आणि पोलिसांमध्ये काय झाला संवाद?
सुषमा अंधारे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली. संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पोलिसांच्या तपासाबाबत काही प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. पोलिस आणि त्यांच्यात झालेला संवाद त्यांनी प्रश्नोत्तराच्या पद्धतीने माध्यमांसमोर मांडला. तो खालीलप्रमाणे आहे.












Click it and Unblock the Notifications