फडणवीस हिंमत असेल तर RSSचे हेडक्वार्टर उध्वस्त करा, सगळे चड्डी अन् काळी टोपीवाले ओळीने..
Sushma Andhare Challenges CM Fadnavis : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांच्या राजकारणासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव वापरल्याबद्दल तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे.
अंधारे यांनी फडणवीस यांना थेट आव्हान देत, मनुवादी विचारांचे केंद्र मानले जाणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुख्यालय उद्ध्वस्त करण्याची मागणी केली आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
सुषमा अंधारे यांनी फडणवीस यांच्यावर हल्ला चढवताना, निवडणुकीपूर्वी जातीय आणि धार्मिक तोडफोड करणे ही त्यांच्या आजच्या राजकारणाची गरज असल्याचे म्हटले. त्यांच्या मते, महाराष्ट्रात पूरग्रस्तांचे प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, वाढती महागाई, पुणे-मुंबईतील वाढती गुन्हेगारी अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर फडणवीस सपशेल अपयशी ठरले आहेत. या अपयशावरून लक्ष हटवण्यासाठी ते 'नॉन-इश्यूज'वर चर्चा घडवून आणत आहेत.

आरएसएस मुख्यालयाला आव्हान
अंधारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा वापर करण्याबद्दल फडणवीस यांना 'सावधान' राहण्याचा इशारा दिला. त्या म्हणाल्या. "बाबासाहेब पचवायचे असतील तर त्यांनी ज्या मनुवादी विचारांना विरोध केला होता, त्या विचारांचे केंद्र असलेल्या आरएसएसला उद्ध्वस्त करा. त्यानंतर मग खाकी चड्डीवाले काळे टोपीवाले (आरएसएस कार्यकर्ते) सगळे ओळीने दीक्षाभूमीवर उभे करा आणि मग आम्ही बाबासाहेब सांगू."
दीक्षाभूमीवर सरेंडर होण्याची मागणी
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना अंधारे यांनी थेट आव्हान दिले की, "तुमच्यात जर हिंमत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या विचारांना विरोध केला, त्या विचारांवर चालणारे आरएसएसचे हेडक्वार्टर पूर्णपणे उध्वस्त करा आणि दीक्षाभूमीवर सरेंडर व्हा."
त्यांच्या मते, जर फडणवीस यांनी असे केले, तरच त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचा अधिकार मिळेल. अन्यथा, त्यांनी बाबासाहेबांचे नाव त्यांच्या 'बेकीच्या राजकारणा'साठी वापरू नये, असा स्पष्ट इशारा अंधारे यांनी दिला.












Click it and Unblock the Notifications