मस्साजोग ग्रामस्थांचा मला पाठींबा असल्याचा सुरेश धस यांचा दावा; जरांगे पाटलांना धक्का? म्हणाले...
मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण विधानसभेत लावून धरल्यानंतर, ते थेट महाराष्ट्रभर पोहोचलं होतं. त्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही या प्रकरणात लक्ष घातलं. त्यानंतर या दोघांनीही मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. परंतु काही दिवसांपूर्वी आ. सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर जरांगे यांनी धसांवरही टिका केली. या सगळ्या गदारोळानंतर आता मस्साजोगच्या ग्रामस्थांनी एक मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

धस यांची मस्साजोगला भेट
आ. सुरेश धस यांनी आज मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची तसेच तेथील ग्रामस्थांनी भेट घेतली. आपल्या भेटीनंतर आ. धस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या संवादात त्यांनी एक मोठा दावा केला. मस्साजोग येथील ग्रामस्थांनी आपल्याला पाठिंबा दिल्याचं त्यांनी म्हटले आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील हे सुरेश धस यांच्यावर टीका करत असताना, दुसरीकडे धस यांच्या दाव्यानुसार मस्साजोगच्या ग्रामस्थांनी धस यांना दिलेला पाठिंबा हा मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी मोठा धक्का असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
जरांगे यांना मोठा धक्का?
आ. सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी भेट घेतली होती. या भेटीची बातमी बाहेर आल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आ. धस यांच्यावर चांगलीच टिका केली होती. धस यांनी केसाने गळा कापल्याचा आरोप, जरांगे यांनी केला होता. मात्र आता आ. धस यांना मस्साजोगच्या ग्रामस्थांनी पाठींबा दिल्याने हा जरांगे यांच्यासाठी मोठा धक्का समजला जात आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
मस्साजोग ग्रामस्थांनी धस यांना पाठिंबा जाहीर केला आहे, असा प्रश्न जरांगे पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, या विषयात मला काही बोलायचं नाही. तो विषय माझ्यासाठी संपला आहे. क्रूर माणसाला जाऊन भेटण्याची काहीच गरज नव्हती. (सुरेश धस) तुमच्यावर पक्षाचा दबाव होता ना, तर तुम्ही सरळ सांगायला पाहिजे होतं. मी समाजाची गद्दारी करू शकत नाही. मी माझ्या समाजासाठी पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा देतो, पण मी धनंजय मुंडे यांना भेटणार नाही, असं धस यांनी सरळ सांगायला पाहिजे होतं, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications