फडणवीसांना आम्ही संस्कारी समजत होतो.. त्यांच्या 'त्या' वक्तव्याचं खूप दुःख होतंय! 'कोण म्हणालं? वाचा
पुणे : ज्यांना आम्ही संस्कारी समजत होतो, त्या देवेंद्र फडणवीसांनी हाणामारीची भाषा वापरावी या वक्तव्यावर मला खूप दुःख झालं...अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.
राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - उद्धव ठाकरे यांच्यात शाब्दीक युद्ध रंगलं आहे. याचदरम्यान फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दात टीकाही झाली. काल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर मानसिकदृष्ट्या खचलेले आणि औरंगजेब क्लबचे ते सदस्य आहेत असा आरोप केला होता. यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रीया दिली.

..ही तर खूपच दुःखाची गोष्ट
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, " ही दुःखाची गोष्ट आहे, देवेंद्र फडणवीस हे फक्त आमचे विरोधक आहेत, वैयक्तिक लढा आमच्यात नाही. आमची लढाई विचारधारांची आहे. पाच वर्ष ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, तेव्हा एक अपेक्षा होती की, ते एक तरुण आणि डायनामीक आहेत. काही करण्याची त्यांची इच्छा आहे.
..तेव्हा मला आश्चर्य वाटलं
सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्रत्येक सरकार काहीतरी चांगले काम करते. मी इतरांसारखं नाही विचार करत की, या सरकारनं काही केलंच नाही ना त्या सरकारनं काही केलंच नाही. प्रत्येक सरकार काही न् काही चांगले काम करतात. देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची विचारांची लढाई आहे, ती वैयक्तिक नाही. पण जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, रस्त्यावर उतरा आणि हाणामाऱ्या करा तेव्हा मला त्यांच्या या वक्तव्याचं आश्चर्य वाटलं.
#WATCH | Pune: On the statement of Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis, NCP-SCP MP Supriya Sule says, "It is very sad because our fight is not personal. This is a fight of ideology. When he (Devendra Fadnavis) was the Chief Minister of Maharashtra for 5 years, we… pic.twitter.com/TfbcyT5pPc
— ANI (@ANI) August 4, 2024
त्यांनी हाणामारीची भाषा वापरली
या राज्याचा गृहमंत्री ज्यांचे नाव भाजपच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत होतं, ते राज्यात सध्या उपमुख्यमंत्री आहेत. जे आधी मुख्यमंत्री राहीले. ज्यांना आम्ही मोठ्या संस्कारी समजत होतो, त्या देवेंद्र फडणवीसांबद्दल मला खूप दुखः झालं, जेव्हा त्यांनी हाणामारीची भाषा वापरली. मी विरोधक आहे पण माझी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खूप जास्त अपेक्षा होत्या असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना म्हटले होते की, माझ्या पायाशी कोणीतरी टरबूज ठेवलं. काही जणांना वाटतं मी त्यांना आव्हान दिले. पण मी कोणत्याही ढेकणांना आव्हान देत नाही, ढेकनांना आव्हान द्यायचं नसतं, तर त्यांना अंगठ्याने चिरडायचे असतं. मी म्हणजे सुसंस्कृत महाराष्ट्र आणि तू म्हणजे दरोडेखोर, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली.
देवेंद्र फडणवीसांनी काय दिलं प्रत्युत्तर?
"उद्धव ठाकरे हे निराश व्यक्ती आहेत आणि या निराशेचा त्यांच्या मनावर वाईट परिणाम झाला आहे. आजच्या भाषणानंतर त्यांनी दाखवून दिले आहे की, तो खरोखरच औरंगजेब फॅन क्लबचा सदस्य आहे," असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल म्हणाले होते.












Click it and Unblock the Notifications