Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शरद पवारांशी चर्चा केली, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची घाई का?; सुनील तटकरेंनी मांडली स्पष्ट भूमिका

Sunil Tatkare Answers 4 Key Questions on Sunetra Pawar Oath : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी ३१ जानेवारी २०२६ रोजी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, या शपथविधीच्या घाईवरून आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चेवरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सर्व प्रश्नांची उत्तरे बेधडकपणे दिली.

Sunil Tatkare Statement

१. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची घाई का झाली?

सुनेत्रा पवार यांनी ७२ तासांच्या आतच शपथ का घेतली, असा सवाल उपस्थित केला जात होता. यावर सुनील तटकरे म्हणाले की, "शपथविधीची तातडीने घाई झाली, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. अजितदादांचे निधन झाल्यानंतर आम्ही तीन दिवसांचा शासकीय दुखवटा पाळला. विधी पूर्ण झाल्यानंतर चौथ्या दिवशी विधिमंडळ पक्षाची बैठक घेतली आणि त्यानंतरच मुख्यमंत्र्यांकडे पत्र दिले. दादांनी स्थापन केलेल्या प्रक्रियेला पुढे नेण्यासाठी हा निर्णय घेणे आवश्यक होते, यात काहीही गैर नाही."

२. दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार का?

अजितदादांच्या अंत्यदर्शनाच्या वेळीच विलिनीकरणाची चर्चा झाल्याचे बोलले जात होते. त्यावर तटकरेंनी आक्रमक पवित्रा घेतला की, "शव अंत्यदर्शनासाठी ठेवलेले असताना विलिनीकरणाची चर्चा त्या प्रांगणात कुणी आणि का केली, याचे उत्तर जनतेला मिळायला हवे. आमचा पक्ष स्वतंत्र आहे आणि आम्ही ४१ जागांवर घड्याळ चिन्हावर निवडून आलो आहोत. आमची वाटचाल 'एनडीए' (NDA) सोबतच राहणार आहे. विलिनीकरणाचा कोणताही विषय नाही आणि दादांची भूमिका २०१९ पासूनच भाजपसोबत जाण्याची स्पष्ट होती."

३. शरद पवारांशी बोलणे झाले का?

सुनेत्रा पवारांच्या निवडीबाबत शरद पवारांनी आपल्याला काहीही माहिती नसल्याचे म्हटले होते. यावर तटकरेंनी स्पष्ट केले की, "घटनेनंतर किंवा शपथविधीपूर्वी शरद पवारांशी आमचे कोणतेही बोलणे झालेले नाही." तसेच, उद्धव ठाकरे गटाने अजितदादांच्या अपघाताच्या चौकशीसाठी जो स्थगन प्रस्ताव मांडला आहे, त्याबाबत तटकरे म्हणाले की, "या अपघाताची सखोल चौकशी व्हावी ही आमचीही मागणी आहे. सत्य लवकरच जनतेसमोर यायला हवे."

४. राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण?

अजित पवारांनंतर पक्षाचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार, या प्रश्नावर तटकरे म्हणाले की, "अध्यक्षपदाबाबतची आमची भूमिका स्पष्ट आहे. कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि मी लवकरच यावर निर्णय घेऊ. आमदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन, पक्षाच्या घटनेनुसार ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली जाईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+