Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

एसटीची भाडेवाढ: आजपासून लालपरीचा प्रवास महागला; महिलांना ५० टक्के सवलत आहे का?

ग्रामीण महाराष्ट्राची धमणी समजल्या जाणाऱ्या एसटीचा प्रवास आजपासून महागला आहे. एसटी महामंडळाने आजपासून १४.९७ टक्के भाववाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा भाववाढ आजपासूनच लागू झाली. एसटीसोबतच रिक्षा व टॅक्सीची भाववाढ येत्या १ फेब्रुवारीपासून होणार आहे. ही भाववाढ शंभर रुपयांना तीन रुपये असणार आहे.

ST travel

काय म्हणाले परिवहन मंत्री?

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीची भाढेवाढ जाहिर केली. ते म्हणाले, प्रत्येक वर्षी काहीतरी भाडेवाढ करणे अपेक्षित असते. मात्र एसटीने मागील काही वर्षांपासून भाववाढ केलेली नाही. वाढती महागाई, वाढते इंधन दर आदी कारणांमुळे एसटीची भाडेवाढ करणे गरजेचे होते. एसटीवर जवळपास तीन कोटींचा बोजा पडत आहे. त्यामुळे ही भाडेवाढ करावी लागली.

तीन वर्षे भाडेवाढ नव्हती

आत्ता केलेली भाडेवाढ खरेतर, विधानसभा निवडणुकीपूर्वीच होणे अपेक्षित होते. कारण २०२१ पासून एसटीने भाडेवाढ केलेली नव्हती. त्यामुळे यावर्षी तब्बल १८ टक्के भाडेवाढ अपेक्षित होती. मात्र त्यामध्ये सुधारणा करत १४.९७ टक्के भाडेवाढ करण्यात आली. या भाडेवाढीमुळे आजपासूनच एसटीचा प्रवास महागला आहे.

महिलांची सवलत कायम

एसटीची सुमारे १५ टक्के दरवाढ कऱण्यात आली असली तरी, सरकारच्या एसटीबाबत सुरु असणाऱ्या सर्व योजना जैसे थेच राहणार असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. म्हणजेच महिलांना दिली जाणारी ५० टक्के प्रवास सवलत यापुढेही सुरु राहणार आहे. लाडक्या बहि‍णींमुळेच एसटी नफ्यात येत असल्याचा दावाही, मंत्री सरनाईक यांनी केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+