बसस्थानकात गेल्याबरोबर मिळणार एसटी बस... लालपरीसाठी सरकारने केले 'हे' खास नियोजन
ग्रामीण महाराष्ट्रासाठी दळणवळणाचे मुख्य साधन असलेली लालपरी आता कात टाकणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यानुसार यापुढे दरवर्षी एसटी महामंडळ पाच हजार साध्या बसेस खरेदी करणार आहे. यामुळे प्रवाशांना आता बसस्थानकात बसची वाट पहावी लागणार नाही. एसटी स्टॅन्डवर गेल्याबरोबर प्रवाशाला एसटी बस मिळणार आहे.

आढावा बैठक संपन्न
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज एसटी महामंडळाची आढावा बैठक घेतली. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष डाँ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व खात्याचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. तसेच जाहिरातीमधून एसटी महामंडळाला दरवर्षी १०० कोटींचे उत्पन्न मिळण्याचे नियोजनही करण्यात आले. राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसला टोल माफी मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचेही बैठकीत ठरले. तसेच आगाराला मिळणाऱ्या डिझेलवर व्हॅट सूट मिळावी, अशी मागणीही सरकारकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
काय घेतले निर्णय?
१. दरवर्षी पाच हजार नव्या साध्या बसेस खरेदी करणार.
२. कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या सात तारखेला होणार.
३. प्रत्येक आगाराच चार्जिंग स्टेशन उभारणार.
४. एसटी महामंडळ इलेक्ट्रिक बसही खरेदी करणार.
५. स्क्रॅब बसेसची संख्या बघून नव्या बस खरेदी होणार.
६. नव्या बसेसवर तिन्ही बाजूने डिजीटल जाहिरात करता येणार.
महामंडळ कात टाकणार
या बैठकीत मंत्री सरनाईक यांनी कामगारांच्या पगाराबाबत काळजी घेण्याचे आदेश दिले. यापुढे कर्मचाऱ्यांचा पगार हा सात तारखेच्या आत देण्याचे नियोजन करण्यात आले. याशिवाय शासनाकडून महामंडळाला मिळणारा निधी हा आगावू स्वरुपात मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. याशिवाय एसटी महामंडळाचे नवीन जाहिरात धोरणही तयार करण्यात येणार आहे. त्यातून महामंडळाला दरवर्षी १०० कोटींचे उत्पन्न मिळविण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.












Click it and Unblock the Notifications