Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

11 ला पेपर सुरु झाला 11.15 ला प्रश्नपत्रिका झेराँक्स दुकानावर आली; दहावीचा पेपर फुटला, पहा काय झाले?

आजपासून इयत्ता दहावीच्या परिक्षेला सुरुवात झाली. पहिल्याच पेपरच्या दिवशी पेपरफुटीची घटना समोर आली. दहावीचा मराठीचा पेपर जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे फुटला. पेपर सुरु झाल्यावर अवघ्या पंधरा मिनिटांत हा पेपर झेराँक्स सेंटरवर मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.

SSC Board Exam 2025

नेमके काय झाले?

जालना जिल्ह्यातील बदनापूर केंद्रात हा प्रकार उघडकीस आला. दहावीचा आज मराठीचा पेपर होता. या पहिल्याच पेपरच्या दिवशी पेपर सुरु झाल्यानंतर पेपर फुटण्याचा प्रकार उघडकीस आला. पेपर सुरु झाल्यानंतर परीक्षा केंद्राजवळ असलेल्या एका झेराँक्स दुकानात मराठीचा पेपर आला. त्यानंतर या पेपरच्या प्रिंट काढण्याचे काम सुरु होते. या प्रिंट परिक्षार्थींच्या नातेवाईक व मित्रांना देऊन त्यानंतर काँफीचे प्रकार सुरु झाल्याच्या चर्चा आहेत.

१५ मिनिटांत प्रश्नपत्रिका बाहेर

राज्यामध्ये आजपासून (२१ फेब्रुवारी) दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू झाली. या परीक्षेसाठी शिक्षण मंडळाने मोठी तयारी केली होती. कॉपी मुक्ती अभियानासाठी अनेक पावले उचलली गेली. परंतु मराठीच्या पहिल्या पेपरला गालबोट लागले. आज 11 वाजता पेपरला सुरुवात झाली. त्यानंतर जालना येथे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये प्रश्नपत्रिका बाहेर आली. जालन्यातील बदनापूर येथील केंद्रावर हा प्रकार घडाला. या ठिकाणी असलेल्या एका झेरॉक्स सेंटरवर थेट उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स मारून विद्यार्थ्यांना पुरवल्या गेल्या. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पालक संतप्त झाले.

चोख व्यवस्था गेली कोठे?

राज्यात काँफीमुक्त अभियान राबवले जात आहे. आजपासून सुरु झालेल्या दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाख विद्यार्थी बसले आहेत. परीक्षेसाठी भरारीपथके, व्हिडिओ चित्रण, सीसीटीव्ही या सर्वांचीच चोख व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हाधिकारी प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. संवेदनशील केंद्रावर विशेष लक्ष ठेवले जात आहे. असे असताना ही प्रश्नपत्रिका १५ मिनिटांत बाहेर कशी आली आणि ती झेराँक्स केंद्रापर्यंत कशी गेली, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+