राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला
सिंधुदुर्ग : मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा दुर्दैवानं कोसळला आहे.यामागचं कारण अद्यापर्यंत कळू शकलेलं नाही. नौदल दिननिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023ला मालवणमध्ये येऊन या पुतळ्याचं लोकार्पण केलं होतं.
एक वर्ष ही पूर्ण झाले तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. यावरुन आता विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सताधारी पक्षांवर जोरदार टिका केली आहे. महाराजांचा पुतळा बसवता महायुती सरकारने काळजी घेतली नाही. सरकारने केवळ पंतप्रधानांच्या हस्ते हा पुतळा उभारायचा एवढा उद्देश ठेवून इव्हेंट केला. या सरकारला कामाच्या दर्जाविषयी देणे-घेणे नाही. कमीशन खाणे, नवीन टेंडर काढणे, यापलिकडे महाराष्ट्र सरकार काही करत नाही अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केली आहे.

'अनथ्या आम्ही तीव्र आंदोलन करु'
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामात, आणि तो पुतळा बसवण्यात जो काही हलगर्जी पणा झाला असेल, या सगळ्या कामात भ्रष्टाचार झाला आहे का याची चौकशी करण्यासााठी राज्य सरकारने समिती नेमली पाहीजे, अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. अनथ्या आम्ही तीव्र आंदोलन करु असा इशाराही वैभव नाईक यांनी दिला आहे.
'पुतळा त्वरीत उभा करणं हे पहिलं काम राहील'
दरम्यान शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं की, पुतळा कोसळल्यासंदर्भातील या घटनेची मला पूर्ण माहिती नाही, ही घटना घडली असेल तर ती अत्यंत दुर्दैवी आहे. पुतळा त्वरीत उभं करणं हे पहिलं काम राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या पुतळ्याचं उद्घाटन झालं होतं. छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या पहिल्या समुद्री किल्ल्याच्या स्मरणार्थ हा पुतळा उभारण्यात आलेला आहे, त्यामुळे भावनिक मुद्दा लक्षात घेऊन हा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना आमचे सरकार करेल.












Click it and Unblock the Notifications