“दादा” शिवसैनिक, मालेगाव शहरातील हिंदू समाजाचा भक्कम आधार
नाशिक : हिंदुत्व हा शिवसेनेच्या विस्ताराचा मुलाधार आहे. मराठीचा मुद्दा घेऊन मुंबईत लढणारी शिवसेना हिंदुत्वाकडे वळली आणि शिवसेनेचा झपाट्याने विस्तार झाला. हिंदुत्व हाच मुद्दा घेऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तडाखेबंद भाषणे केली. मुंबईसह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात या भूमिकेचा शिवसेनेचा विस्तारासाठी प्रचंड मोठा फायदा झाला.
बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका आणि हिंदू धर्मीयांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरणारे रांगडे शिवसैनिक हे हिंदूंचे सुरक्षा कवच बनले. 1993 च्या मुंबई दंगली आणि मालेगाव येथे वेळोवेळी होणाऱ्या दंगलीत शिवसेनेने आणि शिवसैनिकांनी हिंदूंच्या रक्षणाची भूमिका प्राणपणाने निभावली. यातूनच शिवसेनेचे संघटन प्रचंड फोफावले.

उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव हे शहर अत्यंत संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. मुस्लिम बहुल असलेल्या या शहरात छोट्या मोठ्या दंगली वारंवार घडत असतात. 2006 साली मालेगाव येथे बॉम्बस्फोट देखील झाले होते. मालेगाव शहरात असलेल्या संवेदनशील वातावरणामुळे येथील हिंदू बांधवांना जीव मुठीत धरूनच वावरावे लागते. मालेगाव सह अशा अनेक संवेदनशील भागांवर बाळासाहेब ठाकरे यांची बारकाईने नजर होती. आणि त्यांनी अशा संवेदनशील भागात कडवट हिंदुत्ववादी तरुणांना मोठी ताकद दिली. याच तरुणांनी जीवावर उदार होऊन लढा दिला. त्यातले एक नाव म्हणजे राज्याचे सध्याचे खनिकर्म आणि बंदर विकास मंत्री दादाजी भुसे.
लोकप्रिय शिवसैनिक
मालेगाव मध्ये दादा भुसे हे अत्यंत लोकप्रिय शिवसैनिक आहेत. साधा शिवसैनिक म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली. ठाण्याचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्याशी त्यांचा अगदी जवळचा संबंध होता. दिघे यांच्या माध्यमातूनच एकनाथ शिंदे आणि दादा भुसे यांची मैत्री जमली.आनंद दिघे यांचे दादा भुसे यांच्यावर प्रचंड प्रेम होते.. "एक ना एक दिवस तू राज्याचा कृषी मंत्री होशील", असा आशीर्वाद आनंद दिघे यांनी दादा भुसे यांना दिला होता. मालेगावचे उमेदवार म्हणून आनंद दिघे यांनी दादा भुसे यांचे नाव देखील निश्चित केले होते,असे सांगण्यात येते. दादा भुसे यांच्यावर आनंद दिघे यांचा प्रचंड पगडा होता.
मालेगाव या मतदारसंघात दादा भुसे यांनी आक्रमक संघटन उभे केले. हिंदुत्ववादी तरुणांची फौज मालेगाव शहराच्या सुरक्षेसाठी धावून यायची. त्यामुळेच मालेगाव बाह्य ला मालेगाव शहराची ढाल असे म्हटले जायचे. त्यामुळे दादा भुसे यांची मालेगाव मधील हिंदू धर्मियांत लोकप्रियता प्रचंड वाढली.रस्त्यावर उतरून काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळे त्यांचा थेट तळागाळात संपर्क निर्माण झाला.
मंत्रिपदे चालून आली
2004, 2009, 2014 आणि 2019 अशा सलग निवडणुका दादा भुसे यांनी जिंकल्या.2014 च्या देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात दादा भुसे यांना मंत्रीपद मिळाले.आनंद दिघे यांनी वर्तवलेल्या भाकिताच्या अनुसार 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांचा मंत्रिमंडळात दादा भुसे हे राज्याचे कृषिमंत्री झाले.2022 साली शिवसेनेत उठाव झाला आणि चाळीस आमदार तसेच आठ मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले. उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद गेले.शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते झाले .एकनाथ शिंदे यांना समर्थ साथ दिली ती दादा भुसे यांनी. त्यांना राज्याचे बंदर विकास मंत्री म्हणून संधी देण्यात आली.
सामन्यांचे दादा
शेतकरी आणि दादा भुसे,सामान्य माणूस आणि दादा भुसे अत्यंत जवळचे नाते आहे.सलग चार वेळा आमदारकी आणि दोन वेळा मंत्रिपद भूषवूनही दादा भुसे यांच्यातील शिवसैनिक अजून तसाच तरुण आणि ताजा आहे.मालेगाव मध्ये एका घरात चोरी झाल्यानंतर स्वतः त्या घरात शिरून चोराला पकडून आणणारे दादा भुसे,खते विक्री करणाऱ्या दुकानावर सध्या वेशात छापा टाकून खतांची आणि बियाणांची तपासणी करणारे दादा भुसे आजही मालेगावच्या सामान्य शेतकऱ्याला आणि सामान्य माणसाला आपल्यातलेच वाटतात हे दादा भुसे यांच्या तब्बल वीस वर्षाच्या राजकीय कार्यकर्ते चे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
विकासाचे अनेक प्रकल्प
आपल्या वीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत दादा भुसे यांनी मालेगावची संवेदनशील ही ओळख बदलण्याचा कसोशीने प्रयत्न केला. शहरात विकासाचे अनेक प्रकल्प आणि योजना त्यांनी राबवल्या.मालेगाव शहरात 100 खाटांचे महिलांसाठीचे रुग्णालय दादा भुसे यांचा प्रयत्नाने उभे राहिले आहे.दोन आठवड्यापूर्वीच त्या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले.
काष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल या नावाने शेतकी महाविद्यालय उभारण्यात दादा भुसे यांचा मोठा वाटा आहे.या महाविद्यालयातून प्रतिवर्षी बाराशे विद्यार्थी शेतीची पदवी घेऊन बाहेर पडणार आहेत. मालेगावच्या सामान्य तरुणांना वाचनाची गोडी लागावी यासाठी दादा भुसे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सुसज्ज वाचनालय उभारले. या वाचनालयात इंटरनेट आणि संघटन त्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शहराच्या अनेक मागण्या पूर्ण
मालेगाव शहरात संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असावा, अशी मागणी गेल्या 40 वर्षांपासून करण्यात येत होती. दादा भुसे यांच्या प्रयत्नाने शहरात बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. मालेगाव बाह्य आणि मालेगाव मध्य या भागांना जोडण्यासाठी दादा भुसे यांच्या प्रयत्नातून मौसम नदीवर पूल उभारण्यात आला आहे. 250 मीटर लांबी आणि 40 मीटर रुंदी असलेला हा पूल उभारून दादा भुसे यांनी अनेक दशकापासूनची मालेगाव वासीयांची मागणी पूर्ण केली आहे.
मालेगाव ची सांडपाणी व्यवस्था आणि पर्जन्य जलव्यवस्था ही एक मोठी समस्या आहे. ही समस्या दूर करण्यासाठी दादा भुसे यांनी विशेष पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यातून 600 कोटी रुपयांची आणि पाणी योजना आणि भूमिगत गटारी योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेचे काम पूर्णत्वाकडे आहे. या प्रकल्पामुळे मालेगाव शहरात मान्सूनच्या कालावधीत निर्माण होणारी पाणी तुंबण्याची समस्या दूर होणार आहे.
हिंदुत्व आणि विकासाचा समतोल
हिंदुत्ववादाबरोबरच दादा भुसे यांनी विकासाच्या मुद्द्यालाही महत्व दिले आहे. विकास आणि हिंदुत्व यांचा समतोल साधण्यात दादा भुसे यांना यश आले आहे. या दोनच मुद्द्यांवर 2024 ची विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी दादा भुसे सज्ज झाले आहेत.गेल्या वीस वर्षात त्यांनी केलेल्या कामांची पुण्याई त्यांना साथ देईल आणि पुन्हा एकदा दादा भुसे मालेगाव विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत जातील असा ठाम विश्वास त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.












Click it and Unblock the Notifications