Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा ललकारलं! म्हणाले- तुम्ही अडवून दाखवाच..वाचा काय आहे प्रकरण

Shivaji Maharaj Statue Collapse Case :राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकारण ढवळून निघालं. पुतळा कोसळल्यानंतर अनेक नेत्यांनी राजकोटला भेटी दिल्या. त्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे हेही एक सप्टेंबरला राजकोट किल्ल्यावर जोणार आहेत तत्पुर्वी त्यांनी देवेंद्र फडणवीस मला अडवणार आहेत का..? असं म्हणत मनोज जरांगे यांनी दंड थोपटले आहेत.

मनोज जरांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या पुतळ्याच्या जागेची पाहणी करणार आहेत. छत्रपती शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याबाबत कुणीही राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. मात्र जालन्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केलं आहे.

Shivaji Maharaj Statue Collapse Case

जनतेच्या भावना दुखावल्या

पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, छत्रपतींचा पुतळा कोसळल्यानं जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन मी पहाणी करणार आहे. राजकोट किल्ल्यावर जायला देवेंद्र फडणवीस अडवणार आहेत का..? राजकारणासाठी छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर करु नका, असं म्हणत त्यांनी पुतळ्याचं काम करण्यांना दोषी धरलं.

उद्घाटन करणाऱ्यांचा काय दोष?

मनोज जरांगे म्हणाले, उद्धाटन करणाऱ्यांचा यात काय दोष..? हे काम करणाऱ्याला शोधून जेलमध्ये टाकलं पाहिले. आरक्षणाबाबतही जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस प्रत्येक वेळी डाव टाकतात, चालता-चालता फसवतात. ज्या छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन मोदी साहेब महाराष्ट्रातून गेले, त्या शिवरायांचे स्मारक अरबी समुद्रात झालेलं नाही, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला.

मला कोण अडवतो, पाहतो- जरांगे

मनोज जरांगेंनी एक सप्टेंबरला राजकोटला जाण्याचा निर्णय जाहिर केला. ते म्हणाले, उद्घाटन करणाऱ्याचा काय दोष आहे, ज्यानी काम निट केलं नाही त्याला शोधून काढलं पाहिजे. त्याला आधी जेलमध्ये टाका. कोणत्याही महापुरुषाचं बांधकाम नीटच केलं पाहिजे. आम्ही तिथे जाऊन पहाणी करणार आहोत असेही मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

ते संवेदनशील ठिकाण आहे काय?

मनोज जरांगे यांनी राजकोट किल्ल्यासंदर्भात म्हटलं की, ते संवेदनशील ठिकाण आहे का.. ? ती भारत आणि पाकिस्तानची सीमा आहे का? उद्घाटन करणाऱ्याचा काय दोष काम करणारा नीट नसल्यावर... तो मिस्त्री शोधून काढला पाहिजे, त्याला मध्ये टाकले पाहिजे. 1 तारखेला जाणार आहे, ते 600 किमी अंतर आहे, असं म्हणत त्यांनी आपली भेटीची योजना स्पष्ट केली.(Shivaji Maharaj Statue Collapse Case )

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+