Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'महाराष्ट्रातला एक बकरा खाटकाच्या लाकडावर उभा आहे...' संजय राऊत यांच्या 'त्या' ट्टिटची चर्चा

Sanjay Raut : उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नेहमीच पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार टीका करत असतात. त्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. मात्र आज संजय राऊत यांच्या ट्टिटची दिवसभर चर्चा सुरु आहे. संजय राऊत यांनी आपल्या सोशल मिडीयावर एक पोस्ट करत शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधला आहे. या पोस्टमध्ये एका बक-याचा फोटो असून त्याला फोटोला कॅप्शन देण्यात आलं आहे. खबर पता चली क्या? ए सं शि गट... असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान माध्यमांच्या प्रतिनिधी यांनी संजय राऊत यांना या टिट्टबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं . "तुम्ही सगळेजण पत्रकार आहात. त्या फोटोचा अर्थ तुम्ही काढू शकता. तुम्ही ते लाकूड गावात खाटकाच्या दुकानात पाहिलं असेल.

Sanjay Raut

तसेच महाराष्ट्राच्या बकऱ्याला खाटकाच्या लाकडावर उभं केलं आहे. त्याला दिल्लीतून सांगण्यात आलं आहे की, फार शहाणपणा करू नकोस. गप्प राहायचं आणि बेबे करत राहायचं." दोन दिवसांपूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितले आहे. आता बस झाले तुमचे खूप ऐकले, असे राऊत यांनी म्हटलं आहे.

पोस्टमध्ये तुम्ही एसंशि गट असा उल्लेख केला आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, तुम्हाला समजले पाहिजे, एसंशि गट काय आहे? तुम्हाला यूबीटी माहित आहे ना आणि तुम्हाला एसंशि गट माहीत नाही का? असे संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान हनुमान जयंती ज्या शोभायात्रा निघाल्या आहेत त्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. हनुमान जयंतीच्या शोभा यात्रा या पद्धतीने निघत नाही. चर्च, मशिदीसमोरुन कधी शोभायात्रा काढण्यात येत नव्हती. या माध्यमातून देशातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप ही राऊत यांनी केला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+