Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

विधानसभेसाठी शरद पवार सरसावले; नेमकी काय रणनीती?

मुंबई : महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेली आहे. या निवडणुकीत मोठं यश मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने आतापासूनच रणनीती आखायला सुरुवात केली आहे. खरंतर लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला चांगलाच फटका बसला, तर महाविकास आघाडीला मात्र चांगले यश मिळाले.

Sharad Pawar

मतदारांनी दिलेल्या प्रतिसादाच्या जोरावर महाविकास आघाडीने 30 जागा जिंकल्या, तर काँग्रेस समर्थक विशाल पाटील हे देखील सांगलीतून खासदार झाले.

आता मविआचे प्रमुख नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले कसून विधानसभेसाठी रणनीती आखत आहेत. खरंतर आज पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत प्रश्न विचारला असता पवार म्हणाले की," आता आपलं विधानसभा हे एकमेव लक्ष्य आहे."

महाविकास आघाडी म्हणून लढणार:

उद्याची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक हे आपले लक्ष्य असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. या निवडणुकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवेसना एकत्र लढणार आहे" असं शरद पवार म्हणाले. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढणार हे मात्र स्पष्ट झालं आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने मविआला चांगला प्रतिसाद दिला. शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट, डावे सुद्धा सोबत होते. त्यांना आम्ही जागा देऊ शकलो नाही. त्यांच्या हिताची जपणूक करणं आमची नैतिक जबाबदारी आहे. असं देखील पवार यांनी म्हटलं आहे. तीन महिने हातामध्ये आहेत. दोन अडीच महिने मिळतील, त्याचा लाभा घ्यावा हा आमचा प्रयत्न आहे" असं शरद पवार म्हणाले.

राज ठाकरे म्हणाले लोकसभा निवडणुकीने सगळ्यांना जमिनीवर आणलं, त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे, 'माझे पाय जमिनीवर आहेत' मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पुढे ठेऊन निवडणूक लढवावी असं संजय राऊत म्हणतात, त्यावर 'आम्ही तिघे एकत्र आहेत. आमचा सामूहिक चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेऊ इच्छितो' असं उत्तर त्यांनी दिलं.

जागावाटप कधी ठरणार?

राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा जोर धरू लागली आहे. जुलैच्या सुरुवातीला हे जागावाटप अंतिम करण्याचा प्रयत्न असल्याचं महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

भारतीय संघाचे अभिनंदन:

सरतेशेवटी पवार यांनी भारतीय संघाने काल जिंकलेल्या T20 विश्वचषक सपर्धेबाबत शुभेच्छा दिल्या. कालच्या सामन्यात भारतीय टीमने अद्भूत चमत्कार केला. चिंता वाटावी अशी भारताची स्थिती होती. जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, या सगळ्यांनी चांगला खेळ दाखवला. आपण टी 20 वर्ल्ड कप विजयासाठी 100 टक्के खेळाडूच कौतुक केलं पाहिजे. उत्तम कोच मिळाला, द्रविडने योग्य मार्गदर्शन केलं, आत्मविश्वास वाढेल असा सल्ला दिला. त्याचाच परिणाम सामुदायिक यशामध्ये झाला" असं शरद पवार म्हणाले.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+