शरद पवारांकडून अजित दादांच्या अर्थसंकल्पाची एका वाक्यात चिरफाड !
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प शुक्रवारी विधिमंडळात सादर केला. अनेक योजना आणणाऱ्या या अर्थसंकल्पावरून पुन्हा चुलते शरद पवार आणि पुतणे अजित पवार असा सामना रंगलेला पाहायला मिळाला. पुतण्याने मांडलेल्या अर्थसंकल्पाची थोरल्या पवारांनी खिल्ली उडवली आहे.

खिशात 70 रुपये आणि 100 रुपये खर्च, असा हा अर्थ संकल्प असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. लोकसभेत जनतेने दिलेला दणका पाहूनच हा असा अर्थसंकल्प सदर करण्यात आला, असेही पवार यांनी म्हटलं आहे. तसेच हा अर्थ संकल्प फुटला होता असा दावाही पवार यांनी केला आहे.
जनतेच्या पाठींब्याने मी आतापर्यंत मी 10 अर्थसंकल्प मांडले आहेत. अधिकाऱ्यांशी चर्चा केल्या आहेत. तज्ञांशी संवाद साधला आहे. अर्थसंकल्प तयार करताना केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले आहे. त्यामुळे मी नवखा नाही, असा दावा अजित पवार यांनी अर्थ संकल्प सादर केल्यानंतर केला होता. याचा शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. आगामी निवडणूक लक्षात घेऊनच हा अर्थ संकल्प मांडण्यात आलाय, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.
विधिमंडळाच्या कामकाजाचे काही संकेत असतात.अर्थ संकल्प आधी विधिमंडळात सादर केला जातो आणि नंतर त्यावर चर्चा केली जाते.मात्र यावेळी तसे झाले नाही.अर्थ संकल्पात मांडण्यात आलेल्या विविध योजनांची चर्चा दोन दिवस आधीच वृत्तपत्रात तसेच अन्यत्र करण्यात आली होती. त्यामुळे अर्थ संकल्पाच्या संदर्भात पुरेशी गुप्तता पाळली गेली नाही, तुमच्याकडे महसुली जमा किती आहे? दुसरं महसुली खर्च किती होणार आहे? आणि जमेपेक्षा खर्चाची रक्कम अधिक असताना खर्चाचा फरक कसा भरणार? याची तरतूद न करता खर्च करणार म्हटलं आणि विचारपूर्वक केलंय असं म्हटलं तरी त्याला फारसा काही अर्थ राहात नाही, अशी टीकाही शरद पवार यांनी केली.
ज्या गोशी प्रत्यक्षात साकारता येणार नाहीत अशा अनेक गोष्टी अर्थ संकल्पात सांगण्यात आल्या आहेत.ज्या योजना सांगण्यात आल्या आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल याची कालमर्यादा सांगण्यात आलेली नाही.योजना साकारण्यासाठी जितक्या रकमेची आवश्यकता आहे, त्या रकमेची सरकारकडे उपलब्धता नाही. मात्र आपण काहीतरी खूप मोठे काम केले आहे, असे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता या अर्थ संकल्पावर विश्वास ठेवणार नाही, असा दावादेखील शरद पवार यांनी केला आहे.
अजित पवार यांनी म्हटलेल्या ओवीवरूनही टीका
अर्थ संकल्प सादर करताना अजित पवार यांनी तुकाराम महाराजांची एक ओवी सादर केली होती. शरद पवार गटाच्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंट वरून अजित पवार यांची खिल्ली उडवण्यात आली आहे. "आपल्या स्वार्थासाठी हातचं सोडून पळत्याच्या मागे धावणं ही संत परंपरेची शिकवण नाही. पण काहीजण याला अपवाद ठरतात. नशीब बलवत्तर असलं तरी त्यांना त्याची जाणीव नसते. तुकोबा महाराजांच्या ओवी वाचून दाखवणं सोपं असत, पण त्या आत्मसात करून आचरणात आणणं सगळ्यांनाच जमत नाही. अशांची झोळी सदैव फाटकी असते हे दुर्दैव." असा मजकूर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications