Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

वाऱ्यामुळे शिवरायांचा पुतळा पडल्याचे कारण अयोग्य, शिल्पकाराचा अनुभवच कमकुवत - शरद पवार

Sharad Pawar on Shivaji Maharaj Statue : मुख्यमंत्री आणि इतर काहीजण पुतळा पडण्यासाठी वाऱ्याचा वेग कारणीभूत असल्याचे सांगत आहेत. पण राज्यात अनेक ठिकाणी देखील समुद्राच्या ठिकाणी पुतळे आहेत, त्याला वर्षानुवर्षे झालेले आहेत. त्यामुळे शिवरायांचा पुतळा वाऱ्यामुळे कोसळला हे कारण अयोग्य आहे. मुळात मालवण येथील पुतळ्याचे काम ज्याला देण्यात आले होते, त्याचा अनुभव मर्यादित होता, असे परखड मत शरद पवार यांनी मांडत राज्य सरकारवर निशाणा साधला. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आपटेंच्या अनुभवामुळेच अपघात

शरद पवार म्हणाले की, मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम ज्याला देण्यात आले होते, त्या जयदीप आपटे याचा या क्षेत्रातील अनुभव मर्यादित स्वरुपाचा होता. त्याने एवढं मोठं काम कधी केल्याचे दिसत नाही. असं असतानाही त्याच्यावर इतकी मोठी जबाबदारी कशी काय टाकण्यात आली? जयदीप आपटेच्या एकंदरित कामाचा दर्जा पाहता त्यामुळेच हा अपघात घडल्याचे दिसते, असा संशय देखील शरद पवार यांनी व्यक्त केला.

Sharad Pawar on Shivaji Maharaj Statue

मग अन्य ठिकाणी काय अनुभव

शरद पवार यांनी शिवरायांच्या पुतळा कोसळल्याच्या प्रकरणावर सविस्तर भाष्य केले. ते पुढे म्हणाले की, हल्ली राज्यकर्ते व अन्य काही लोक पुतळा वाऱ्यामुळे कोसळल्याचा दावा करत आहेत. पण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. मुंबईत इंडिया गेटनजीक शिवाजी महाराजांचा पुतळा 1960 साली उभारण्यात आला होता. त्यात अद्याप काहीही झालेलं नाही. शिवाजी पार्कध्येही शिवाजी महाराजांचा पुतळा आहे.तिकडेही मागच्या बाजूला समुद्र आणि समोर मैदान आहे.

सरकारची भूमिका लोक सहन करणार नाही

शरद पवार म्हणाले की, पुतळ्याचे काम ज्याला देण्यात आले होते, त्याचा अनुभव मर्यादित होता. त्याला अशाप्रकारचेम देणं योग्य नव्हतं. शेवटी घडायचे ते घडलेच. त्यामुळे राज्यभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या. महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, तो तयार करण्यासाठी कुणाला काम दिलं, त्यात भ्रष्टाचार झाला. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत असे वागले जाते. सरकारची ही भूमिका राज्यातील लोक सहन करणार नाहीत, असे म्हणत पवारांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

फडणवीसांच्या विधानावर शरद पवारांचे भाष्य?

छत्रपती महाराजांनी सूरत लुटली नव्हती. लूट हा शब्द काँग्रेसने आपल्या तोंडी घातला, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच केले होते. याबाबत शरद पवार यांनी भाष्य करताना म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांनी एक वेगळं विधान केलं आहे. त्यामधून ध्वनित होते की, सूरतेची अशाप्रकारे लूट करण्याचं काम छत्रपतींनी केलं नव्हतं. चुकीचा इतिहास मांडण्याचं काम काँग्रेस पक्षाकडून केलं जात आहे, असे फडणवीसांनी विधान केलेले आहे.

मुळात याबाबत वास्तव चित्र मांडायचा अधिकार ज्यांचे आयुष्य इतिहास संशोधन करण्यात गेले त्या लोकांना आहे. इतिहास अभ्यासक जयसिंगराव पवार यांनी देखील कालच याबाबत विधान केलेले आहे. शिवाजी महाराजांनी सूरतेवर एकदा नव्हे दोनदा स्वारी केली. पण त्याचा उद्देश वेगळा होता. इंद्रजीत सावंत इतिहास अभ्यासक आहे, त्यांनीही जयसिंगराव पवार यांच्या मताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे साहजिक अपेक्षा आहे की, खोटा इतिहास जनतेसमोर मांडू नये, नव्या पिढीच्या समोर मांडू नये, चुकीचा इतिहास मांडायचा कोणी प्रयत्न केला तर समाजात गैरसमज निर्माण होतात, असेही शरद पवार म्हणाले.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+