Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

जात-धर्म काहीही असो, शेवटी आपण भारतीय, सामंजस्याची भूमिका घ्यावी; आरक्षणावर शरद पवारांचे भाष्य

Sharad Pawar on Maratha OBC reservation : आरक्षणाच्या प्रश्नावरुन तणाव होण्याचं कारण नाही, जात धर्म काही असला तरी शेवटी आपण भारतीय आहोत. महाराष्ट्राचे एक घटक आहोत. आपल्या सगळ्यांमध्ये सामंजस्य कसं करता येईल याबाबतची भूमिका या क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्यांनी घेतली पाहिजे. राज्य सरकारनं अशा प्रश्नांना विलंब देखील लावू नये. लोकांना विश्वासात घ्यावे अन् त्यांची पूर्तता करून राज्यातील वातावरण चांगलं करावे, असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आरक्षणाच्या प्रश्नावरुन भूमिका मांडली.

Sharad Pawar

मविआची जागावाटप चर्चा अंतिम टप्प्यात..

पुढे बोलताना शरद पवार यांनी महाविकास आघाडीचं जागावाटप, अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा, आणि राज्यातील आरक्षण प्रश्नावरुन सुरु असलेल्या आंदोलनांबाबत भाष्य केले. आगामी विधानसभा निवडणूक तीन पक्ष मिळून लढणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे तीन पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत. तीन पक्ष एकत्र लढतात असतात त्यावेळी कुठल्याही एका जागेवर तिघांपैकी कुणी ती लढवावी याबाबतचा निर्णय आणि एकवाक्यता करावी लागते. ती प्रक्रिया सुरु आहे. तिन्ही पक्षांचे नेते गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत बसत आहेत. जागा वाटपाचा निर्णय झाल्यानंतर तो तो पक्ष तिथं कोण उमेदवार द्यायचा विचार करेल. आम्ही तीन पक्ष एकत्र बैठक घेणार आहोत, असं शरद पवार म्हणाले.

प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काय मिळाले...

पावसामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या आहेत. सरकारनं शेतकऱ्यांसाठी काही धोरणं जाहीर करतो म्हणून सांगितलं आहे. काही धोरणं जाहीर करण्यात आली पण शेवटी शेतकऱ्यापर्यंत काय पोहोचलं हा महत्त्वाचा भाग आहे. फार मोठा वर्ग असा आहे ज्याच्या पर्यंत काही पोहोचलं नाही त्याच्यामुळं तो अस्वस्थ आहे. आम्ही काही दिवस थांबू आणि मुख्यमंत्र्यांना भेटून दुरुस्ती करता येते का ते पाहू, त्यातून मार्ग निघेल असं शरद पवार म्हणाले.

आतिशी देखील चांगल्या काम करतील..

अरविंद केजरीवाल चांगलं काम करत होते. केजरीवाल यांची टीम देखील चांगलं काम करत होती. अरविंद केजरीवाल यांना एका विशिष्ट स्थितीत कॉर्नर करण्यात आलं, मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं गेलं. यानंतर केजरीवाल यांनी राजीनामा दिला. मुख्यमंत्री म्हणून ज्यांची निवड करण्यात आली त्यांचं काम आम्ही दिल्लीत पाहतोय, असं शरद पवार म्हणाले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+