Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही? सुप्रिया सुळे म्हणाल्या "दादा राहीले नाही क्या मायने रहता है"

Sharad Pawar Ajit Pawar NCP Merger Updates : "अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांची रा्ष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होणार का, विलिनीकरणाची शक्यता किती, खरंच विलिनीकरण होणार की, नाही याबद्दल राज्यातील जनतेच्या मनात अनेक प्रश्न आहेत, त्यातच विलिनीकरणावर दोन्ही पक्षातील नेत्यांकडून भिन्न प्रतिक्रीया आल्यानंतर जनतेच्या मनात सम्रंभ आहे.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेश शरद पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी "माझा भाऊच (अजित पवार) आपल्यात नाहीत, आता अशा परिस्थितीत मी विलीनीकरणाला काय महत्व राहतं." असे भावनिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे विलिनीकरणाबद्दल अधिकच संशयाचे ढग दाटले आहेत.

Sharad Pawar Ajit Pawar NCP Merger

सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यातील महत्त्वाचे मुद्दे

मीडिया रिपोर्ट आणि दोन्ही पक्षाच्या वक्तव्याचा अंदाज घेतला तर अजित पवार आणि शरद पवारांच्या पक्ष यांच्यात विलीनीकरणाबाबत चर्चा झाल्याचे म्हटले जाते. जर अशी चर्चा झालेली होती आणि आज अजित पवार हयात असते, तर कदाचित ही प्रक्रिया पूर्ण झाली असती, पण अजित पवारांचे निधन झाल्यानंतर हा मुद्दा अनुत्तरीत आहे व निर्णयापर्यंत पोहचेल का ही शंका लोकांना वाटते.

सुप्रिया सुळेंची भावनिक साद

सुप्रिया सुळेंना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, "आज माझा भाऊच राहीला नाही, आता दादाच नाही राहीले तर क्या मायने रखता है. याचं दुःख, दादांनी घेतलेले निर्णय, दादांचे स्वप्न दादांबरोबरच गेले, आज माझा भाऊच नाही राहीला त्यामुळे आज कोण काय बोलतयं याला महत्व नाही. आता न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहू. उगाच कुणाबद्दल काय काढावं त्याला काही अर्थ नाही, दादांचं आणि माझं जे काही बोलणं होतं ते दादा आणि माझ्यामध्ये आहे आणि ते वास्तव आहे , ते बऱ्याच लोकांना माहीतेय."

कायदेशीर पेच

सध्या दोन्ही गट 'खरी राष्ट्रवादी' कोणाची यावरून न्यायालयात लढत आहेत. सुप्रिया सुळे यांनी आता पूर्ण चेंडू न्यायालयाच्या कोर्टात टाकला असून, कोर्टाचा निकाल येईपर्यंत कोणतीही अधिकृत हालचाल होणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

विलीनीकरण होणार की रखडणार? (माध्यमांचे रिपोर्ट काय सांगतात?)

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार आणि शरद पवार यांच्यात विलीनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. १२ फेब्रुवारी २०२६ ही तारीख विलीनीकरणाच्या अधिकृत घोषणेसाठी ठरवण्यात आली होती, असेही काही रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. मात्र, अजित पवारांच्या निधनामुळे हे सर्व समीकरण बदलले आहे.

१. विलीनीकरण रखडण्याची कारणे

अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या गटाचे नेतृत्व आता सुनेत्रा पवार (उपमुख्यमंत्री) यांच्याकडे आले आहे. सुनेत्रा पवार यांनी नुकतीच दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली असून, सध्या त्यांनी विलीनीकरणावर तूर्त काही बोलू नये असे सांगितले असावे अशी शक्यता आहे. अजित पवार गटातील काही नेते (उदा. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल) सध्यातरी 'महायुती'सोबत राहण्यास आणि स्वतःचे अस्तित्व टिकवण्यास प्राधान्य देत आहेत.

२. विलीनीकरणाच्या शक्यता

राजनैतिक अस्तित्व: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपसमोर टिकण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत काही आमदारांनी व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनीही मध्यंतरी सुतोवाच केले होते की, दादांना पक्ष पुन्हा एकत्र आणायचा होता. त्यामुळे भविष्यात दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+