'हे' 3 पुरावे, 'या' 3 कबुल्या; कराडची फाशी फिक्स? आता मनोज जरांगेंना मंत्री मुंडेंवर 'हा' मोठा संशय

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने आता वेग घेतला आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी न्यायालयात बाजू मांडताना जोरदार युक्तीवाद केला. त्यांच्या युक्तीवादानंतर वाल्मिक कराड यांच्यासह ८ जणांवर एप्रिलमध्ये न्यायालय आरोप निश्चित करण्याची शक्यता आहे. बुधवारी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी संबंधित कागदपत्रांसह प्रकरणातील तथ्ये न्यायालयासमोर सादर केली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी होणार आहे.

Santosh Deshmukh murder case

उज्ज्वल निकम यांचा युक्तीवाद

उज्ज्वल निकमांनी सरपंच संतोष देशमुखांची हत्या कशी झाली, हेच न्यायालयात उलगडून दाखवले. हत्येचा सगळा लेखाजोगाच निकमांनी तारखांसहीत न्यायालयासमोर मांडला. या गॅगचा लिडर सुदर्शन घुले आहे व त्याचे पुरावेही आहेत, असा दावा निकम यांनी केला. उज्ज्वल निकम यांच्याकडे दुसरा पुरावा होता तो वाल्मिक कराडच्या फोनच्या आवाजाच्या नमुन्यांचा. तोही त्यांनी न्यायालयात सादर केला. वाल्मिक कराड थेट खंडणी मागतानाचा कोणताच पुरावा नाही. असा युक्तिवाद वाल्मिकच्या वकिलांनी केला होता. परंतु पोलिसांनी वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने तापसले. त्यातून कराडनेच खंडणी आरोपींना खंडणी मागायला पाठवल्याचे समोर आले. फरार आरोपी कृष्णा आंधळेने तब्बल 3 वेळा कराड आणि चाटेला फोन केल्याचा गौप्यस्फोटही उज्ज्वल निकमांनी न्यायालयात केला.

दिले कराडच्या बैठकीचे पुरावे

8 ऑक्टोबर 2024 ला वाल्मिक कराडच्या कार्यालयात विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडची एक बैठक झाली. याच बैठकीत आवादा कंपनीकडून 2 कोटींची खंडणी मागण्याचे निश्चित झाले. यासाठीच तिथं आवादा कंपनीचे अधिकारी शिवाजी कोकाटेंना बोलवण्यात आले. त्यांना वाल्मिक कराडने प्रत्यक्ष खंडणीची धमकी दिली. यानंतर 9 ऑक्टोबरला कोकाटेंनी कंपनीतल्या वरिष्ठांना कळवलं. दिल्लीतल्या वरिष्ठांनी त्यांना तक्रार करु नका, असा सल्ला देण्यात आला. यानंतर 26 नोव्हेंबर 2024 ला सुदर्शन घुले कंपनीत गेला. त्याने पुन्हा शिवाजी कोकटेंना धमकी दिली. यानंतर 29 नोव्हेंबरला वाल्मिक कराडने आवादा कंपनीचे अधिकारी सुनिल शिंदेंला बोलावले. यावेळी वाल्मिकने विष्णू चाटेचा फोन वापरला. वाल्मिकने फोन केला तेव्हा सुनिल शिंदेंनी फोन स्पिकरला ठेवला होता. सगळं संभाषण रेकॉर्ड होत होतं आणि शिवाजी कोकाटेही ऐकत होते. हे सगळं निकमांनी पुराव्यासह कोर्टाला सांगितलं.

तिघांनी कबूल केला गुन्हा

या प्रकरणाच्या सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान, पोलिस चौकशीत आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी देशमुख यांच्या हत्येची कबुली दिल्याचे समोर आले आहे. घुले यांनी त्याच्या साथीदारांसह हा खून कसा केला हे देखील स्पष्ट केले आहे. तपासादरम्यान, जेव्हा घुले यांनी हत्येचा आरोप नाकारला, तेव्हा पोलिसांनी त्यांना अवाडा कंपनीच्या व्यवस्थापकाकडून खंडणी मागतानाचा व्हिडिओ दाखवला. मग त्याची सर्व काळी गुपिते उघड झाली आणि त्याने सर्व काही कबूल केले.

मनोज जरांगे यांची मागणी

देशमुख हत्या प्रकरणात माजी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनोज जरंगे यांनी केली आहे. देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. परंतु त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप त्यांनी केला. मुंडे यांच्या सूचनेवरून सरपंचाची हत्या करण्यात आली. त्यामुळे ते कलम ३०२ अंतर्गत आरोपी होतात. भाजप आमदार सुरेश धस यांना कटात उभे करत जरंगे म्हणाले की, सरकारच्या काही प्रतिनिधींनी देशमुख प्रकरणात हस्तक्षेप करून मुंडे यांना वाचवले, असा आरोपही जरांगे यांनी केला. या हत्येचे नियोजन मुंडेंच्या बंगल्यावर करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनाही आरोपी करा, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. आ. सुरेश धस यांना मध्यस्थी घालून धनंजय मुंडे यांना वाचविलं जात असल्याचं, मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+