OBC आरक्षण जाऊ शकते! प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले - आयसीयूतून सम्रंभ करु नका
प्रकाश आंबेडकरांनी एका व्हिडिओद्वारे ओबीसी आरक्षणावरील वक्तव्यावर संजय राऊत यांनी परखड टीका केली. "बाळासाहेब आंबेडकरांची प्रकृती लवकर सुधरावी यासाठी त्यांना शुभेच्छा मी देतो. त्यांचे वक्तव्य मला कुणीतरी सांगितले पण ते सत्यावर आधारीत नाही.कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाला कुणीही हात लावणार नाही. बाळासाहेब आंबेडकरांनी भ्रम निर्माण करणारी वक्तव्य आयसीयूमधून करु नये. त्यांनी आधी आपली प्रकृती सांभाळावी, महाराष्ट्र आम्ही सांभाळतो." असे म्हणत प्रत्युत्तर दिले.
संजय राऊत आज माध्यमांशी संवाध साधत होते. त्यांनी देवेंद्र फडणवीसांची सुरक्षायंत्रणा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे धोरण यावर जोरदार टीका केली.

देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीकास्त्र
संजय राऊत म्हणाले, राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःचीच सुरक्षा स्वतःच वाढवली. फोर्स वन कमांडो अत्याधुनिक शस्त्रास्त्रासह त्यांच्या घराला गराडा घालून बसले आहेत. हा प्रकार काय आहे. देवेंद्र फडणवीस यांना कुणापासून धोका आहे. ते या राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांना नक्की कुणापासून सुरक्षा हवी आणि कुणापासून सुटका हवी आहे. मुख्यमंत्र्यांपासून धोका आहे का कारण भविष्यात मुख्यमंत्रीपदाची जी जंग आहे, ती पुढच्या पंधरा दिवसांत आणखी वाढणार आहे. त्यांनी काही आश्वासने दिली होती ती त्यांच्याकडून पुर्ण झाली नाही, अशांकडुन धोका आहे फडणवीसांवर इस्त्रायल, युक्रेन किंवा लिबिया हल्ला करणार आहे काय?
महाराष्ट्र लुटण्याचे काम सुरु
संजय राऊत म्हणाले, ज्या मुख्यमंत्र्यांची बेकायदेशीर नेमणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली, घटनाबाह्य पद्धतीने सुभेदार नेमले. दिल्लीतील बादशहा जसे सुभेदार नेमत होते आणि त्या त्या प्रांतात लुट करत होते तो लुटलेला माल दिल्लीत जायचा. पुर्वीचा तो प्रघात होता तो केंद्र सरकारच्या बादशहाने तो कायम ठेवला आणि महाराष्ट्र लुटण्याचे काम सुरु केले, आणि महाराष्ट्रातील सुभेदार जास्त माल देत असल्याने दिल्ली खूश होणारच.
आयसीयूत संम्रंभ निर्माण करणारी वक्तव्य नको
संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब आंबेडकरांची प्रकृती लवकर सुधरावी यासाठी त्यांना शुभेच्छा मी देतो. त्यांचे वक्तव्य मला कुणीतरी सांगितले पण ते सत्यावर आधारीत नाही.कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाला कुणीही हात लावणार नाही. बाळासाहेब आंबेडकरांनी भ्रम निर्माण करणारी वक्तव्य आयसीयूमधून करु नये. त्यांनी आधी आपली प्रकृती सांभाळावी, महाराष्ट्र आम्ही सांभाळतो.
काय म्हणाले होते बाळासाहेब आंबेडकर
मी सध्या आयसीयूत आहे. माझ्यावर अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी झाली आहे. आता मी डाॅक्टरांच्या निरीक्षणात आहे. इलेक्शनची सुरुवात झाली आहे, ही निवडणूक अत्यंत महत्वाचे आहे. ओबीसीसाठीही ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे कारण विधानसभेनंतर ओबीसीचे आरक्षण थांबवले जाऊ शकते आणि दुसरी बाजू म्हणजे एससीच्या आरक्षणाची अमलबजावणी होणार आहे.
निवडणूक महत्वाची आहे. विधानसभेत आमदार निवडून आले तर आरक्षणावरचा हल्ला थांबवला जाऊ शकतो म्हणून सर्व कार्यकर्त्यांना उमेदवार आणि आरक्षणवादी जनतेला आवाहन करतो की, वंचित बहुजन आघाडीमागे उभे राहा.












Click it and Unblock the Notifications