370 कलम हटवून काय दिवे लावले? काश्मीरी जनता तडफडतेय! ठाकरेंना टार्गेट करणाऱ्या अमित शहांना उत्तर
Sanjay Raut's reply to Amit Shah : काश्मीरमध्ये आमच्या जवानांच्या हत्या सुरु आहेत. अतिरेक्यांचे हल्ले सुरु आहेत. हे कलम हटवल्यानंतर काश्मीरी पंडितांची घरवापसी होणार होती पण ती झाली नाही. एकही काश्मीरी पंडितांना ते सुरक्षित घरी पाठवले गेले नाही. आजही काश्मीरी जनता तडफडतेय. 370 कलम हटवण्याला शिवसेनेने विरोध केला नाही, उलट पाठींबाच दिला. हे कलम हटवून भाजपने अमित शहांनी काय दिवे लावले हे आपण सांगावे, असा पलटवार करुन शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांना सवाल केला आहे.
अमित शहांनी काल महाराष्ट्रात सभा घेत उद्धव ठाकरे कलम 370 हटवण्याला विरोध करणाऱ्यांसोबत बसले असे म्हणत काल त्यांच्यावर टीका केली होती. त्या पार्श्वभुमीवर संजय राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.

..तर महाराष्ट्र उभा करणार नाही
संजय राऊत म्हणाले, वीर सावरकरांचा विषय हा नसती उठाठेव भाजपने करु नये. आम्ही सातत्याने सांगतो की, वीर सावरकरांना भारतरत्न द्या पण आपण का देत नाही? आम्ही गेली दहा वर्ष आमचा घसा कोरडा करतो आहोत त्यांना भारतरत्न देणे हे अमित शहांच्या हातात आहे, जर ते ३७० कलम हटवून पाठ थोपवून घेऊ शकता तर मग भारतरत्न देऊ शकता. अमित शहांनी भाजपच्या पोस्टरवरचा बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो काढा लोक तुम्हाला महाराष्ट्रात उभे करणार नाही.
370 कलम हटवून काय दिवे लावले
संजय राऊत म्हणाले, अमित शहा खोटे बोलत आहेत आणि व्यापारी नेहमी खोटे बोलतात. दुकानदार आपल्या फायद्यासाठी नेहमी भेसळ करतो किंवा खोटे बोलतो. ग्राहकाला फसवतो. 370 कलमाला कुणी विरोध केला असेल काही भूमिका मांडल्या असतील. 370 कलम हटवण्याला शिवसेनेने विरोध केला नाही उलट पाठींबाच दिला. हे कलम हटवून भाजपने अमित शहांनी काय दिवे लावले हे आपण सांगावे.
काश्मीरमध्ये आमच्या जवानांच्या हत्या सुरु आहेत. अतिरेक्यांचे हल्ले सुरु आहेत. हे कलम हटवल्यानंतर काश्मीरी पंडितांची घरवापसी होणार होती पण ती झाली नाही. एकही काश्मीरी पंडितांना ते सुरक्षित घरी पाठवले गेले नाही. आजही काश्मीरी जनता तडफडतेय. एकही उद्योग नवीन आला नाही. एकही रोजगार निर्माण झाला नाही. फक्त गौतम अदानी यांच्यासाठी जमीनी मोकळ्या केल्या. बाकी त्यांनी काहीच केले नाही.
आमदार विकत घेतले पण जनता नाही
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात राजकारणाचा जो चिखल केला त्याला जबाबदार अमित शहा हे आहेत आणि त्यांची व्यापारी आणि खां-खां वृत्ती महाराष्ट्राला कंगाल करण्यासाठी अमित शहासारख्या व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रावर चिखल उडवला आहे. या राज्याची जनताच सत्ता कुणाला द्यायची ते ठरवेल. हे अमित शहा नाही ठरवू शकत आमदार विकत घेतले असतील पण अमित शहांनी महाराष्ट्राची 14 कोटी जनता विकत घेतलेली नाही. अमित शहा गुजरात, महाराष्ट्राचे नेते नाही. ते देशाचे कधीच नेते होऊ शकत नाही. त्यांच्या हातात पोलिस सीबीआय, इडी आहे तोपर्यंत ते दहशत निर्माण करु शकतात.
ते खोटारडे लोक आहेत
संजय राऊत म्हणाले, मुस्लिम टोपी नरेंद्र मोदी इस्लामिक राष्ट्रात जाऊन घालतात. भाजपकडे कोणताही विषय नाही, विकास, रोजगार, शेतकरी हा विषय नाही. त्यांच्याकडे फक्त धर्म आणि टोप्या आहेत. महाराष्ट्रात निवडणूक जिंकण्यासाठी जर ते धर्म आणि टोप्या आणत असतील तर त्या चालणार नाही. आम्ही काश्मीरला पुर्ण राज्याचा दर्जा देऊ हे नरेंद्र मोदी यांनीच सांगितलेले आहे. कसले काय ते खोटारडे लोक आहेत.












Click it and Unblock the Notifications