"मोदी, शहा अदानी परप्रांतीय! त्यांना राज ठाकरे मदत करत आहेत" - संजय राऊतांनी घेतला समाचार
Sanjay Raut's criticism of Raj Thackeray, PM Modi and Amit Shah : राज ठाकरेंनी सत्ता द्या आम्ही 48 तासांत मशिदीवरील भोंगे उतरवतो असे विधान केले. त्यावर संजय राऊतांनी हा भोंगा गेली 20 वर्षांपासून आम्ही ऐकत आहोत. त्यासाठी सत्तेची अजिबात गरज नाही. तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मोदी, शहांसोबत आहात म्हणजे सत्तेसोबत आहात. तुम्ही फडणवीसांसोबत आहात म्हणजे सत्तेसोबतच आहात. तुमच्या हाती सत्ता येईल येणार नाही हा पुढचा प्रश्न आहे पण मोदी, शहा अदानी परप्रांतीय आहेत, त्यांना राज ठाकरे मदत करत आहेत असा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊतांनी केला.
संजय राऊत आज पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज ठाकरे यांचा समाचार घेतला. त्यांनी इडीसंदर्भातही वक्तव्य केले असून कातडी वाचवण्यासाठी आमचे लोक आणि इतर पक्षाचे लोक भाजपसोबत गेल्याचा आरोप केला आहे.

कातडी वाचवण्यासाठी ते भाजपसोबत गेले
संजय राऊत म्हणाले, प्रताप सरनाईक, भावना गवळी काय म्हणत आहे याला आता अर्थ नाही. सर्वच पक्ष सोडून गेले त्यात अजित पवारही आले ते इडलीमुळे भाजपसोबत गेले, स्वतःची कातडी वाचवण्यासाठी ते गेले. तसे नसते तर भाजपसोबत जाताच प्रफुल्ल पटेल काय आणि इतर लोक काय त्यांच्या प्रापर्ट्या मोकळ्या झाल्या नसत्या. सध्या तरी इडी आणि सीबीआयच्या फायली बंद करुन कपाटात ठेवल्या नसत्या. हसन मुश्रीफ असो की, शिवसेनेतून फुटून गेलेले आमचे लोक असतील. इडीला घाबरुन पलायन त्यांनी केले आहे. जे साध्य करायचे मागच्या दोन वर्षांत केले आहे. इडीची कारवाई थांबली असल्याने आवाज येत नाही मग पलायन करणाऱ्यांच्या घशाला बुच बसला आहे.
माझ्यावरही इडीचा दबाव टाकण्यात आला होता
संजय राऊत म्हणाले, तेव्हा शिवसेना नेत्यांसह माझ्यावरही भाजप इडी, सीबीआयच्या माध्यमातून दबाव टाकत होते, मी स्वतः व्यंकय्या नायडूंना पत्र दिले होते ते संसदेत रेकाॅर्डवर आहे. अनिल देशमुखांवरही दबाव होता. वायकर मात्र पळुन गेले. वायकर थोडीच सांगणार की दबाव होता हे, कालपर्यंत ते आमच्यासोबत होते पण दुसऱ्या दिवशी उडी मारली अन् फाईल बंद झाली.
भाजपने हाती खंजीर दिला
संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा त्याग करा आमच्यात या ही भाजपची रणनिती होती खंजीर खुपसणाऱ्यांना भाजपने हाती खंजीर दिले.आम्ही वाघ आहोत. आम्ही दबाव झुगारला पण काही कमजोर हृदयाची माणसं असतात. शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं...ते डरकाळ्या फोडत असतात पण त्यांचं काळीज हे उंदराचंच होतं हे आम्ही पाहीलं.
आमचा जमीर जिवंत आहे
संजय राऊत म्हणाले, इडीतून सुटका म्हणजे पुनर्जन्म आहे असे मी मानणार नाही. माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही. आपण मनुष्य आहोत. पुनर्जन्म सगळे खोटं आहे. आम्ही मेलोच नव्हतो. आमचा जमीर अजूनही जिवंत आहे. आम्ही ताठ मानेनं संकटं झेलली.
राज ठाकरे सत्तेसोबतच आहेत
राज ठाकरेंनी सत्ता द्या आम्ही 48 तासांत मशिदीवरील भोंगे उतरवतो असे विधान केले. त्यावर संजय राऊतांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, हा भोंगा गेली 20 वर्षांपासून आम्ही ऐकत आहोत.त्यासाठी सत्तेची गरज नाही. अजिबात सत्तेची गरज नाही. तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मोदी, शहांसोबत आहात म्हणजे सत्तेसोबत आहात. तुम्ही फडणवीसांसोबत आहात म्हणजे सत्तेसोबतच आहात. तुमच्या हाती सत्ता येईल येणार नाही हा पुढचा प्रश्न पण शिवसेनेने गेली 55 वर्ष कोणत्याही सत्तेशिवाय आपले अनेक कार्यक्रम राबवले आहे.
..तर शिवाजी पार्कवर संघर्ष होऊ शकतो
संजय राऊत म्हणाले, मोदी, शहा, अदानी परप्रांतिय आहेत त्यांनाच आधी बाहेर काढा मग बाकीच्यांचे बघू. राज ठाकरे मोदी, शहांसारख्या परप्रांतियांना मदत करत आहेत. सतरा नोव्हेंबरला शिवाजी पार्क मिळावं म्हणून शिवसेना आग्रही आहे. त्या दिवशी बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतीदिन आहे. यावर संजय राऊत म्हणाले, सतरा नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर शिवसैनिकांचा राबता राहणार आहे. ठाकरेंच्याच सभेला परवानगी मिळायला हवी होती. संध्याकाळी त्यांची सभा आणि आमचा दिवसभर राबता असेल, त्यांना अडवलं जाईल आणि तसं झालं तर तिकडे संघर्ष होऊ शकतो.












Click it and Unblock the Notifications