येत्या २३ तारखेला महाविकास आघाडीचीच सत्ता; संजय राऊत यांनी मांडले सत्तेचे गणित
Maharashtra Assembly Election 2024-महाराष्ट्रातील विधानसभेसाठी काल मतदान झाले. शनिवारी मतमोजणी होईल. या सगळ्या निवडणूक प्रक्रियेवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आज पत्रकारांसमोर भाष्य केले. यावेळी बोलताना महाराष्ट्रात महाविकस आघाडीच सत्ता येईल, असा दावा संजय राऊत यांनी केला.

राऊतांचा सत्तास्थापनेचा दावा
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, येत्या 23 तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू. महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळतील. एक्झिट पोलवर कुणीही विश्वास ठेवू नका. आतापर्यंत कोणते एक्झिट पोल खरे ठरले, हा तपासाचा भाग आहे. एक्झिट पोलसाठीही त्यांनी प्रचंड पैसे त्यांनी वाटले. तरी सुध्दा ही निवडणूक महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. अभिमानावर लढलेली आहे. पैशाच्या प्रवाहात वाहून न जाता लोकांनी मतदान केलं, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
आदानींवरही केला घाणाघात
संजय राऊत यांनी गौतम अदानींवरही घाणाघात घातला. ते म्हणाले, गौतम अदानींना आज वॉरंट निघालं. महाराष्ट्र अदाणीला विकायला निघालेला आहे. ट्रंप सरकारने अदाणी विरोधात वॉरंट काढले आहे. धारावी, एअरपोर्ट अनेक टेंडर आहेत. त्यातही गौतम अदाणीने, संगनमत करून जागा बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रंप प्रशासनाने जशी कारवाई केली त्याप्रमाणे आम्ही सुध्दा कारवाई करू, म्हणून आम्हाला पाडण्याचा प्रयत्न झाला. असाही आरोप संजय राऊत यांनी केला. अदानींमुळे देशाला डाग लागला आहे. महाराष्ट्रात जी लढाई झाली, ती अदानी राष्ट्र बनू नये म्हणूनच झाली, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.












Click it and Unblock the Notifications