आम्हाला गोळ्या झाडा, हत्या करा...संजय राऊत नेमके का संतापले..? 'ही' आहेत कारणे
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज सरकारला धारेवर धरत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गेल्या दोन दिवासंपासून महाराष्ट्रात सुरु असलेल्या हत्या व अदानी-फडणवीस भेटीवरही त्यांनी जोरदार हल्ला चढवला. गृहखात्याचो घोळ मिटत नसल्यानेच राज्यात गुन्हेगारी वाढली म्हणत, राज्य चालत नसेल तर आम्ही रस्त्यावर उतरु त्यावेळी तुम्ही आम्हाला गोळ्या घातल्या तरी चालतील, असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.

गुन्हेगारीवर राऊतांचा हल्ला
विधानसभेच्या निकालाला आता महिना होत आला असला तरी मंडळाची स्थापना होत नसल्यावर राऊतांनी जोरदार टिका केली ते म्हणाले, राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय. मात्र सरकारला जनतेची काळजी नाही. गुंडांचं राज्य आलंय. बीडमध्ये सरपंचाची हत्या होतेय, आमदाराच्या मामाचं अपहरण करुन मारलं जातंय, पराभूत आमदार गुंडांची भाषा वापरताहेत, सतीश वाघसारख्या उद्योजकाला मारलं जातयं. ही अतिशय गंभीर बाब आहे. मात्र तरीही खात्यांचं वाटप होत नाही. महायुती सरकारमध्ये खातेवाटपावरुन एकमत होत नाही. पण एकडे जनतेच्या आयुष्याचा प्रश्न निर्माण झालाय, त्याच सरकारला काही देणंघेणं नाही.
फडणवीसांवर केली टिका
संजय राऊत पुढे म्हणाले, विधानसभेच्या निकालानंतर 20 दिवसानंतरही जर मंत्रीमंडळाची स्थापना होत नसेल, गृहखातं कोणाकडे आहे हे ठरत नसेल, तर या राज्यातल्या सरकारचा उपयोग काय? दिवसाढवळ्या लोकाचं अपहरण होतंय, हत्या होतंय आणि पोलीसप्रमुख खासदारांचा फोन उचलत नसतील तर ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीस यांना हे राज्य अशा प्रकारेच चालवायचं आहे का..? असा सवाल करत राऊत म्हणाले, फडणवीसांना हे राज्य कसं चालवायचंय ते त्यांनी एकदा सांगावं. मग आम्ही त्यांना उत्तर देऊ. आम्ही रस्त्यावर उतरू. आम्ही रस्त्यावर उतरल्यावर तुम्ही काय करणार, आमच्यावर गोळ्या झाडाल. आम्हाला तुरूंगात टाकाल. बाकी तुम्ही काय करु शकता? असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
अदानी भेटीवर केली टीका
दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली होती. यावरही संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला. राऊत म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्र अदानीच्या घशात घालण्याचे काम सध्या सुरु आहे. जगातील श्रीमंत उद्योगपतींपैकी एक उद्योगपती असलेले अदानी आता महाराष्ट्रातले टोलनाकेही चालवायला घेणार आहेत. जकातनाके, विमानतळ, भाजीची दुकाने, संसद आणि आता अदानी महाराष्ट्रातले टोलनाकेही चालवत असतील, तर बाकीच्यांनी काय कारायचे..? आम्ही यावर आवाज उठवणार आहोत, असंही राऊतांनी सांगितलं.












Click it and Unblock the Notifications