संजय राऊत म्हणतात अमित शहा, पीएम नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले की भिती वाटते..! काय आहे कारण वाचा

Sanjay Raut on Narendra Modi Amit Shah : "घटनाबाह्य सरकार त्यांनी या राज्यात पीएम नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी बसवले त्याला संरक्षण देण्यासाठी अमित शहा महाराष्ट्रात येतात. अमित शहा किंवा मोदी महाराष्ट्रात आले की, आम्हाला भिती वाटते. काहीतरी महाराष्ट्रातील एखादा उद्योग या राज्याबाहेर जाईल किंवा एखादा भुखंड अदानींच्या घशात जाईल याची भिती वाटते आणि हे लोक त्याची तयारी करायला महाराष्ट्रात येतात." असं क्तव्य शिवसेना युबीटी नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते.

गृहमंत्र्यांनी काश्मिरात जायला हवं

संजय राऊत म्हणाले, देशात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. देशाच्या सुरक्षेविषयी गृहमंत्री किती गंभीर आहे हे दिसतच आहे. त्यांनी मणीपूर, काश्मिरात जाऊन थांबायला हवे. तिथे हल्ले होत आहेत. चीनचे सैन्य लडाखमध्ये घुसत आहे तिथं जायला हवं. पण त्यांना महाराष्ट्राची निवडणूक महत्वाची वाटते, म्हणून ते येथे येत आहेत.

Sanjay Raut on Narendra Modi Amit Shah

अदानींच्या घशात भुखंड घालतील

संजय राऊत म्हणाले, घटनाबाह्य सरकार त्यांनी या राज्यात बसवले त्याला संरक्षण देण्यासाठी अमित शहा महाराष्ट्रात येतात. अमित शहा किंवा मोदी महाराष्ट्रात आले की, आम्हाला भिती वाटते. काहीतरी महाराष्ट्रातील एखादा उद्योग या राज्याबाहेर जाईल किंवा एखादा भुखंड अदानींच्या घशात जाईल त्याची तयारी करायला काही लोक येत आहेत. म्हणजेच अमित शहा येत आहेत.

अदानींना काल दोनशे एकर जमीन देण्याचा निर्णय

काल दोनशे एकर जमीन अदानींना द्यायचा निर्णय झाला. त्या जमीनीचे मोजमाप करायला येतात का..हे लक्षात घेता आम्हाला भाजपचे नेते येथे आले की, भिती वाटते. कारण महाराष्ट्राच्या फुटीसंदर्भात ते काहीतरी निर्णय घेत असतात. देशाच्या गृहमंत्र्यांनी कोणतं काम करायला हवं,याबाबत संविधानात काही नियम असतात. ते सर्व बाजूला ठेवून हे फक्त निवडणुका, प्रचार, लाडक्या उद्योगपतींना मदत असले प्रकार करतात आणि विरोधकांवर हल्ले हेच त्यांचे काम राहीले आहे. सरकार पटेल जे देशाचे गृहमंत्री होते ते काय करत होते याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी.

संजय राऊत म्हणाले, व्यक्तिगत सुडाचं राजकारण करण्यासाठी गृहमंत्रालयाचा वापर या देशात कुणी आधी केला नाही पण अमित शहा नेमकं तेच करत आहेत. महाराष्ट्रातील निवडणुका होईपर्यंत देशाची राजधानी महाराष्ट्रात हलवतील असे वाटते.

याचा अर्थ आहे की, लोकांचं मत त्यांच्या विरुद्ध आहे, त्यांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसतो आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच मेट्रोचे उद्घाटन त्यांनी सहा वेळा केलंय. पुण्यात त्यांच्या चकरा वाढल्या हे लक्षात घ्या असंही ते म्हणाले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+