शिवरायांचा पुतळा बनवण्याच्या कामात फडणवीस, शिंदेंनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला - संजय राऊत

जनतेच्या शेतातील एका काडीलाही हात लावायाचा नाही ही शिवरायांची शिकवण होती. त्या शिवरायांचा पुतळा बनवण्यासाठी हजारो कोटींचा भ्रष्ट्राचार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याचा आरोप शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी आज केला.

शिवरायांचा मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर हल्लाबोल केला. त्यावेळी ते बोलत होते.

Sanjay Raut on Narayan Rane Devendra Fadnavis

कालचा राडा गृहखात्यावर थुंकण्याचा प्रकार

संजय राऊत म्हणाले, गेटवे आॅफ इंडिया जवळील पुतळा 1961 यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना बांधण्यात आला, तो अजून जसाचा तसाच आहे. कालचा राडा गृहखात्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. भाजपचे लोक काल मालवणमध्ये शिव्या देत होते असे म्हणत नौदलाला भ्रष्टाचारी ठरवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा धिक्कार त्यांनी यावेळी केला. तसंच मोदींच्या हेलिपॅटमध्ये टेंडरमध्ये पैसे खाल्ले असतील असा आरोपही त्यांनी केला.

कुणी किती कमीशन खाल्ल!

संजय राऊत म्हणाले, भाजपने पैसा खाल्ला असून ती गंभीर बाब आहे. पुतळा यामुळे तुटला की त्यात भ्रष्ट्राचार झाला. याचा व्यवहार झाला असून कुणी दोन तर कुणी पाच हजार कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचं सांगत आहे. किती खर्च झाला कुणी किती कमीशन खाल्लं शिवाजी महाराजांच्या कामात भ्रष्ट्राचार होणे ही चुकीची गोष्ट आहे.

एकनाथ शिंदे, फडणवीसांकडून भ्रष्ट्राचार

संजय राऊत म्हणाले, लोक आजही सांगतात की, स्वराज्य चालवायचं तर शिवाजी महाराजांसारखं चालवायचं. जनतेच्या शेतातील एका काडीलाही हात लावायाचा नाही ही शिवरायांची शिकवण होती. त्या शिवरायांचा पुतळा बनवण्यासाठी हजारो कोटींचा भ्रष्ट्राचार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याचा आरोप शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी आज केला.

देवेंद्र फडणवीसांवर महाराष्ट्राचा राग...

या सरकारने भ्रष्ट्राचार केला त्यांनी राजीनामा द्यायला हवा. पुतळा कोसळला मग तो कसा काय कोसळू शकतो, भ्रष्ट्राचार झाला म्हणूनच कोसळला ना. हे लोक कुठे कुठे भ्रष्ट्चारा करतात जिथे जिथे श्रद्धेची गोष्ट येते तिथे ते भ्रष्ट्चार करतात. भाजपच्या एका व्यक्तीनं आयएनएस विक्रांत प्रकरणात पन्नास कोटी रुपये खाल्ले. महाराष्ट्रातील जनतेचा देवेंद्र फडणवीसांवर राग यामुळे आहे की, ते असे भ्रष्ट्राचाराचे प्रकरणं दाबून टाकतात. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण असो की, आयएएस विक्रांत असो त्यांन हेच केलं आता आयएनएस विक्रांतचं प्रकरण न्यायालयाने पुन्हा या प्रकरणाची फाईल उघडली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+