50-50 कोटी कुठून आणले? आमदार, खासदार खरेदीसाठी तुम्ही साताऱ्यात शेती पिकवत होता का- CM शिंदेंना सवाल
Maharashtra Assembly Election 2024 : आमदार आणि खासदार विकत घेण्यासाठी 50 - 50 कोटी रुपये कुठून आणले. 100 कोटी रुपये कुठून आणले. त्यांना विकत घेण्यासाठी तुम्ही साताऱ्यात शेती पिकवत होता का..असा सवाल करत शिवसेना युबीटी पक्षाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सवाल केला आहे. यासह राज्यातील सत्तेत लुटारु बसले असून त्यांना हटवणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला.
शिवसेना, काँग्रेस आणि NCP (SCP) हे तीन पक्षात जागावाटप, जाहीरनामा किंवा इतर कोणत्याही कामकाजात मतभेद नाहीत, अशी स्पष्टोक्ती शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी आज दिली. ते प्रसारमाध्यमांशी आज मुंबईत बोलत होते.

आम्ही लोकसभेला 31 जागा जिंकल्या
संजय राऊत म्हणाले, उत्तरप्रदेशानंतर महाराष्ट्र असे राज्य आहे, जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका आहे. आम्ही लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ३१ जागा जिंकल्या. युपीनंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा आहेत. आम्हाला वाटतं की, आम्ही विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटकपक्ष एक असू आणि एकत्र लढवू.
आमच्यात कोणतेही मतभेद नाही
संजय राऊत यांनी माध्यमांसमोर हे स्पष्ट केले की, मविआ म्हणून आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. जागावाटप असो, आघाडीची भूमिका असो किंवा जाहीरानामा असो यात कोणताही वाद नाही. उद्धव ठाकरेंनी सांगितले की, आपल्याला एकत्र काम करायचे आहे.
#WATCH | Mumbai, Maharashtra: Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut says, "MVA has organised a very big rally today... MVA wants to contest the Vidhan Sabha elections together. The three parties, Shiv Sena, Congress, and NCP (SCP) have no difference of opinion either in seat… pic.twitter.com/AuLCeQjz9b
— ANI (@ANI) August 16, 2024
जे राज्याला लुटताहेत त्यांना हटवायचेय
संजय राऊत यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला, ते म्हणाले, राज्यातील सत्तेवर जे लुटारु बसले आहेत, या राज्याला ते लुटत आहेत, त्यांना हटवायचे आहे. आज महाविकास आघाडीची मुंबईत जोरदार रॅली होत आहे. त्यात उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. त्यानंतर शरद पवार संबोधित करणार आहे. नाना पटोलेंसह इतर नेते संबोधित करतील, तिथे पाहा काय होणार ते असेही ते म्हणाले.
सरकार ठेकेदारांकडून वसुली करतेय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधक जेव्हा सत्तेत होते तेव्हा राज्यात हप्ता वसूल करीत होते असा आरोप केला होता. त्यावर संजय राऊत यांनी परखड भूमिका मांडली. ते म्हणाले,सध्याचे सरकार ठेकेदाराकडून हप्ता घेत आहे आणि जनतेच्या तिजोरीवर महायुती डल्ला मारत असून पैसे देऊन मतं विकत घेत आहे. संजय राऊत यांचे हे विधान लाडकी बहिण योजनेसंदर्भातही होते.
50 -50 कोटी कुठून आणले
संजय राऊत म्हणाले, 50 -50 कोटी कुठून आणले. 100 कोटी रुपये कुठून आणले, आमदार आणि खासदार विकत घेण्यासाठी तुम्ही साताऱ्यात शेती पिकवत होता का..अशी जोरदार टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केला तसेच काही प्रश्नही उपस्थित केले.












Click it and Unblock the Notifications