महाराष्ट्रातून पैशांच्या थैल्या दिल्लीला दिल्या अन् राज्याचं पायपुसणं केलं - सीएम शिंदेंवर मोठा आरोप

नवी दिल्ली: महाराष्ट्रातून दिल्लीच्या पैशांच्या थैल्या दिल्लीला पोहचवल्या पण महाराष्ट्राची अवस्था राज्यातील सत्ताधाऱ्यांनी दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं अशी करुन ठेवली. गुजरात व्यापार मंडळाला असा बिनकण्याचा मुख्यमंत्री राज्यकर्ता हवा असतो. पद्धतीने एकनाथ शिंदे काम करत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केलीय.

दोन डाऊटफूल मुख्यमंत्री

संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा उल्लेख 'एक फूल, दोन डाऊटफूल मुख्यमंत्री' असा केला. या तिघांमध्ये सुरु असलेला संघर्ष महाराष्ट्र पाहत आहे. मी पुन्हा सांगतो की, अमित शाह यांच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाहीत, कधीच नव्हते.

Sanjay Raut on Eknath Shinde over Budget

संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यांच्यामध्ये फार मोठं कर्तृत्व आहे का, कर्तबगारी आहे का, अनुभव आहे का, तर अजिबात नाही. दिल्लीला पैशांच्या थैल्या द्यायच्या. महाराष्ट्राची अवस्था त्यांनी दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं अशी करुन ठेवलेय. गुजरात व्यापार मंडळाला असा बिनकण्याचा मुख्यमंत्री राज्यकर्ता हवा असतो. त्या पद्धतीने एकनाथ शिंदे काम करत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

दिल्लीने महाराष्ट्राला कंगाल केलं

संजय राऊत म्हणाले, 70 हजार कोटीच्या घोटाळ्याची मदत भाजपला होणार असेल, तसेच अजित पवारांसोबतचे इतर सहकारी ज्यांनी मिर्चीचा घोटाळा केला,
बँकाच्या घोटाळ्याचे आरोप केलेल्यांच्या मदतीवर हे सरकार चालणार असेल तर माझा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कोपरापासून नमस्कार आहे. अजित पवार म्हणतात, जमिनी विकून पैसा आणू का? याचा अर्थ महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. दिल्लीने महाराष्ट्राला कंगाल केले.

हा अर्थसंकल्प इस्ट इंडिया कंपनीचा

महाराष्ट्रातील राज्यकर्ते केंद्रीय अर्थसंकल्पाचे कौतुक करत आहेत. पण हा गुजरातमधील इस्ट इंडिया कंपनीचा अर्थसंकल्प आहे. केंद्राला बिहारमधील पूर दिसला पण महाराष्ट्रातील पूर दिसला नाही. देवेंद्र फडणवीस आकडेमोड करताना दिसले. महाराष्ट्रावर आठ लाख कोटींचे कर्ज आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+