ही काय वेळ महाराष्ट्रावर? पुतळ्याच्या कामात सत्ताधाऱ्यांच्या लाडक्या माणसांनी पैसे खाल्ले!-संजय राऊत
महाराष्ट्रातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवसेना युबीटी नेते तथा खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "मोदी-फडणवीसांनी उभे केलेले शिवरायांचे पुतळे पडले" पुतळ्याच्या कामात सत्ताधाऱ्यांच्या लाडक्या माणसांनी पैसे खाल्ले असा आरोप करत संजय राऊत यांनी ही काय वेळ महाराष्ट्रावर आली असा सवालही केला आहे.
सामनाच्या रविवारीय रोखठोक या आपल्या सदरात संजय राऊत यांनी लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारमधील सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

महाराष्ट्र अस्वस्थ पण पेटून का उठला नाही?
संजय राऊत यांनी लिहिलेल्या लेखात म्हटले की, राम गणेश गडकऱ्यांनी आपल्या 'महाराष्ट्र गीता'त दर्यावर्दी जीवनाची मर्दुमकी गाताना सिंधुदुर्गालाच शौर्याचे प्रतीक मानले. त्या सिंधुदुर्गाच्या 'जंजिरे' राजकोटवरील छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा अक्षरशः कोसळून पडला. छत्रपतींच्या पुतळ्याचे ते उद्ध्वस्त अवशेष पाहून महाराष्ट्राच्या हृदयाची शकले झाली. औरंगजेबाने महाराष्ट्रावर स्वारी करताना मंदिरे तोडली, देवांच्या मूर्ती तोडल्या व ते भग्न अवशेष पाहून महाराष्ट्र पेटून उभा राहिला. शिवरायांच्या पुतळ्याचे अवशेष पाहून महाराष्ट्र अस्वस्थ झाला, पण पेटून का उठला नाही? असा प्रश्न पडतो. पुतळ्यांच्या विटंबना होताना आपण सगळेच पाहतो, पण येथे प्रत्यक्ष शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना खुद्द महाराष्ट्राच्या राज्यकर्त्याकडून व्हावी यासारखे दुर्दैव ते कोणते !
महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची लाट
संजय राऊत यांनी लिहिलेल्या लेखात म्हटले की,महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची लाट उसळली आहे. सर्वच कामांत पैसे खाल्ले जातात. भ्रष्टाचार करून पैसे खाण्यासाठी मुख्यमंत्री शेकडो कोटींचा निधी आपल्या माणसांना देतात. 'लाडक्या ठेकेदारांना काम द्या व कमवा' अशी नवी योजनाच मुख्यमंत्र्यांनी सुरू केली. त्या योजनेतून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजही सुटले नाहीत. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पुतळ्यास भ्रष्टाचाराने पोखरले व तो पुतळाच कोसळून पडला. सिंधुदुर्ग किल्ल्याने केलेला आक्रोश महाराष्ट्राचे काळीज चिरत आहे.
मोदी-फडणवीसांनी उभे केलेले पुतळे कोसळले
संजय राऊत यांनी लिहिलेल्या लेखात म्हटले की,शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला एवढ्यापुरताच हा विषय मर्यादित नाही. येथेही सत्ताधाऱ्यांच्या लाडक्या माणसांनी पैसे खाल्ले. हा विषय गंभीर आहे. 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान मोदी यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पुतळ्याचे अनावरण केले. लोकसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पीएम मोदींकडून पुतळ्याचे अनावरण व्हावे यासाठी शिल्प व पुतळ्याभोवतीचे सुशोभीकरण घाईघाईने करून घेतले. शिवपुतळा परिसराच्या सुशोभीकरणावरच पाच कोटींहून जास्त खर्च केले.
सर्व पुतळे दिमाखात उभे असताना मोदी-फडणवीसांनी उभे केलेले शिवरायांचे पुतळे पडले. यांना मुंबईच्या अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक उभे करायचे होते व त्याचे समुद्रातील पूजनही अशाच पद्धतीने गाजावाजा करीत मोदींच्या हस्ते केले. त्या अरबी समुद्रातील स्मारकाची अद्याप एकही वीट रचली गेलेली नाही व आता सिंधुदुर्गावरील महाराजांचा पुतळा कोसळून पडला.
पालकमंत्र्यांनी आधी राजीनामा द्यायला हवा
संजय राऊत यांनी लिहिलेल्या लेखात म्हटले की, 400 वर्षांपूर्वी उभारलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचा एकही चिरा इतक्या वर्षानंतर ढासळलेला नाही, पण आता उभा केलेला शिवरायांचा पुतळा त्याच किल्ल्यावर कोसळला. भ्रष्टाचार, बेफिकिरी व राजकीय साठमारीचा फटका छत्रपतींना बसला. राजकोटावर घाईघाईने उभारलेला शिवरायांचा पुतळा हा राजकीय फायद्यासाठीच होता. त्यातील ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले व सिंधुदुर्गातील लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारात वापरले हे आता स्पष्ट झाले. याच पैशांतून कुडाळ, मालवण, कणकवलीत मते विकत घेण्यात भाजपचे पुढारी व मंत्री पुढे होते. त्या भ्रष्ट मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या सिंधुदुर्गाच्या पालकमंत्र्यांनी आधी राजीनामा द्यायला हवा.
महाराष्ट्र थंडपणे पाहत बसला
ही काय वेळ आली महाराष्ट्रावर? शिवरायांची इतकी घोर विटंबना होऊनही महाराष्ट्र थंडपणे पाहत बसला. मराठी मन पेटले का नाही? असे आता म्हणावेसे वाटते. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील या घटनेनंतर भाजपचे वर्तन हे महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे नव्हते. सिंधुदुर्गातील भाजपच्या गुंडांनी भ्रष्ट ठेकेदारीचे समर्थन केले व विरोधकांना किल्ल्यावर जाण्यापासून रोखले. पत्रकारांना धमक्या दिल्या. महाराजांच्या पवित्र वास्तूसमोर शिवराळ भाषा वापरली व या सर्व कृत्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी समर्थन केले.
महाराष्ट्राने हे सर्व उघडपणे पाहिले. अशा विकृत राज्यकर्त्यांना जोडे मारून हाकलायला हवे. या दुर्घटनेच्या निषेधार्थ सरकार विरोधातील महाविकास आघाडीचे ते 'जोडे मारो' आंदोलन पार पडले, पण तरीही एक खंत आहेच, शिवरायांच्या अपमानानंतर महाराष्ट्र उसळला का नाही?(Sanjay Raut on Eknath Shinde Devendra Fadnavis)
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन!










Click it and Unblock the Notifications