शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई का नाही? शेपट्या घालून का बसलात? राऊतांचा फडणवीस सरकारला सवाल
Sanjay Raut on CM Fadnavis : "छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा घोर अपमान केला, तो कोरटकर का सापडत नाही. शिवरायांवर वादग्रस्त वक्तव्य करणारा राहूल सोलापूरकर तुमचा कार्यकर्ता असल्याने त्याच्यावर कारवाई होत नाही असे म्हणत संजय राऊत यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? मुग गिळून..शेपट्या घालून का बसलात?" असा सवाल देवेंद्र फडणवीस सरकारला केला आहे.
संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवरुन फडणवीस सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले, "मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आणि मुंबईवर जो मराठी ठसा आहे तो मोडायचा आहे. हे लपून राहीलेले नाही. मुंबई कमजोर करायची, मुंबईतील मराठी माणसांची विभागणी करायची या सर्व गोष्टी करुन झाल्या आहेत, मराठी माणसांत फूट पाडून झाली हे सर्व भाजपच्याच लोकांनी केले आहे, त्यात लोढा हे एक आहेत, अशी अनेक नावे आहेत, काही अर्थपुरवठादार आणि देणगीदार आहेत. हे देवेंद्र फडणवीस आणि भय्याजी जोशींनाही माहीत आहे."
..तो तर भाजपच्या रणनितीचा भाग
संजय राऊत म्हणाले, "मुंबईची भाषा मराठी नाही हे छातीठोकपणे सांगणे हा भाजपच्या पुढच्या रणनितीचा एक भाग आहे. त्यांनी एक ठिणगी टाकून पाहीली त्याचा परिणाम काय होतो, हे त्यांना जाणून घ्यायचे आहे. "
प्रशांत कोरटकर का सापडत नाही?
संजय राऊत म्हणाले, "प्रशांत कोरटकर कोण ज्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा घोर अपमान केला, तो कोरटकर का सापडत नाही, प्रशांत कोरटकरचा त्याचा वावर देशाच्या गृहमंत्र्यापासून महाराष्ट्राच्या राज्यपालांपर्यंत आणि सर्व आयएएस, आयपीएएसच्या जीवावर फिरतोय. त्याला भाजपचेच आशीर्वाद आहेत. राहूल सोलापूरकर हे आरएसएसच्या मुख्यालयात जाऊन बैठका घेतात, त्यांनी शिवाजी महाराज हे भ्रष्टाचारी आहेत असेच सांगितले. त्यांच्या बोलण्याचा अर्थ असाच आहे."
राहूल सोलापूरकर यांना अटक करण्याची मागणी
संजय राऊत म्हणाले, "देवेंद्र फडणवीस असो की, त्यांचे सरकार अशा लोकांवर काय कारवाई झाली जे शिवछत्रपतींची निंदा करतात. एकप्रकारे हे औरंगजेबाचे उदात्तीकरण आहे. राहूल सोलापूरकर यांना अटक करुन राजद्रोहाचा खटलाही त्यांच्यावर दाखल करायला हवा. देवेंद्र फडणवीस सरकार यांच्याबाबतीत मुग गिळून का बसलात शेपट्या घालून का बसलात ते तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत म्हणून...? हा माझा प्रश्न आहे."
अजय अशर यांच्यावर टीका अन् आरोप
संजय राऊत म्हणाले, "प्रवीण परदेशींची उद्योजकांच्या समितीवर नेमणूक होणे याचे मी स्वागत करतो. अजय अशर एक बिल्डर होता ठाण्यातील त्यांचे उद्योग सर्वांना माहित आहे. आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जमीनीचे व्यवहार पाहणारा आणि पैशांचा संरक्षक, कलेक्टर तो होता. शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पैशांची देवाणघेवाण करण्यात आली, त्यात सुरतचे खासदार आणि मुंबईचे ठेकेदार आणि अजय अशर हे होते. त्यांनी आता देश सोडला असून देशातून त्यांनी पलायन केले," असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
"एकनाथ शिंदेंच्या उड्या बंद केल्या"- राऊत
एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न होतोय का या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, "एकनाथ शिंदे यांना पंख कधीच नव्हते, ते फक्त उड्या मारायचे. त्यांना कधीच पंख नव्हते. त्यांच्या फक्त बेडूक उड्या होतो. पंख असलेला माणूस हा गरुडछेप घेतो. पंख छाटले असे मी म्हणणार नाही पण त्यांच्या उड्यांना बंदी घातली आहे."
-
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा -
आजचे राशीचक्र: कुणाचे नशीब चमकणार आणि कुणाला संघर्ष करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य










Click it and Unblock the Notifications