छत्रपती शिवाजी महाराजांचा रोज अपमान करायचा, नंतर माफी मागत सुटका करायची- राऊतांची राज्य सरकारवर टीका
sanjay raut :"आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणे हा राजकारणाचा विषय नाही पण त्यांचा (महायुती) चा असू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा रोज अपमान करायचा आणि नंतर माफी मागून सुटायचं..असं सरकार करतेय" अशी टीका शिवसेना युबीटीचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत यांची आज मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
'आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करत नाही. शिवराय हे राजकारणाचा विषय नाही, महायुतीचा असेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा रोज अपमान करायचा आणि नंतर माफी मागून सुटायचं. माफी मागितल्यावर सोडायचे का..छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा माफी मागण्यालायक नाही, याला अपराध म्हणतात. सार्वजनिक बांधकाम मंत्री कुठे आहेत, भ्रष्टाचार करणारे कुठे आहेत, त्यांनी राजीनामे द्यावे माफी कशाला मागता आहात." असं संजय राऊत म्हणाले.
स्वतःला फकीर म्हणतात अन् महलातून फिरतात
संजय राऊत म्हणाले, "मणीपूर देशाचा हिस्सा आहे. पण पंतप्रधानांना ते आपल्या नकाशात आहे असं वाटत नाही. भाजप आणि खासकरुन पंतप्रधानांच्या लक्षात नाही. ते युक्रेन, पोलंड अशा देशात फिरतात. एअरफोर्स वन या बड्या विमानानं फिरतात, बायडनच्या धर्तीवर जातात. एअरइंडिया वन हे महलासारखं आहे आणि ते म्हणतात मी फकीर आहे, फकीर महलात फिरतात.."अशी बोचरी टीकाही संजय राऊत यांनी केली.
युबीटीचा संजय राऊतांनी सांगितला कार्यक्रम
संजय राऊत म्हणाले, "अतिवृष्टीनं हाहाकार उडाला, पुरपरिस्थिती निर्माण झाली त्यातून नुकसान झालंय. सर्व गोष्टींसाठी सरकारकडं पैसा आहे पण त्यांच्याकडं शेतकऱ्यांसाठी द्यायला काहीच नाही पुनर्वसनासाठी काहीही नाही. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आज शिवसेनेचे आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जात आहेत. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आम्ही शेतकऱ्यांच्या दुखःनुकसानीची अडचणी आम्ही समजून घेऊ त्यानंतर नांदेडपर्यंत पुढे जाणार आहोत."
On the Badlapur incident, Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut says, "The Chief Minister (Eknath Shinde) and Home Minister (Devendra Fadnavis) are not talking about this, we are talking about this... Who made the CCTV footage disappear from the school? The head of the institution… pic.twitter.com/PUXs9LFR68
— ANI (@ANI) September 4, 2024
सरकारवरच आपत्ती शेतकऱ्यांकडं लक्ष नाही
संजय राऊत म्हणाले, "शिवाजी महाराजा राजकोट इथला पुतळा कोसळून जो प्रकार घडला त्यानंतर या सरकारवर जी आपत्ती कोसळली त्या आपत्तीतून त्यांना सावरायला वेळ नाही. तिथेच त्यांचं आपत्ती व्यवस्थापन कोलमडलंय. आदीत्य ठाकरेंनी दौरा जाहीर करताच मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारला जाग आली. पंचनामे, नुकसानभरपाई आपत्तीची आठवण आली पण हे ढोंग आहे. शेतकऱ्यांना माहितेय की, वारंवार हे सरकार त्यांच्या बाबतीत दुर्लक्ष करतेय. विद्यार्थी, शेतकऱ्यांसाठीचा सर्व निधी फक्त राजकीय कारणांसाठी एकाच योजनेकडे वळवला त्यामुळे शेतकऱ्यांवर आपत्ती आली."
बदलापूरचं सीसीटीव्ही फुटेज कुणी गायब केलं?
बदलापूर घटनेवर शिवसेना (UBT) नेते संजय राऊत म्हणाले, "मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) आणि गृहमंत्री (देवेंद्र फडणवीस) याबद्दल बोलत नाहीत, आम्ही याबद्दल बोलत आहोत... सीसीटीव्ही फुटेज कोणी गायब केले? फक्त एका हवालदाराला वाचवण्यासाठी संस्थेच्या प्रमुखाने हे केले असावे की सरकार काय करत आहे?"
-
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
LPG Cylinder New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल; ग्रामीण भागात आता 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस -
मनोरंजन विश्वावर शोककळा! अवघ्या 27व्या वर्षी प्रसिद्ध कलाकाराचा संशयास्पद मृत्यू -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
Horoscope Today March 12, 2026 Marathi : गुरुवार ठरणार प्रगतीचा दिवस; वाचा तुमच्या राशीत काय आहे खास -
IPL 2026 Schedule: आयपीएलचे 15 दिवसांचे वेळापत्रक समजून घ्या; पहिल्या सामना RCB Vs हैदराबाद










Click it and Unblock the Notifications