Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ठाकरे बंधूंच्या पुनर्मिलन कसे झाले? संजय राऊतांनी सांगितला राज-उद्धव एकत्र येण्याचा 'इनसाईड प्लॅन

Sanjay Raut interview raj uddhav thackeray reunion inside story : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वात मोठी चर्चा ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाढत्या जवळीकीची आहे. यावर शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी पहिल्यांदाच सविस्तर भाष्य केले आहे. "राज आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही कुटुंब म्हणून एकत्र येण्याचा निर्णय घेतला असून, ही एक प्रकारची राजकीय 'लव्हस्टोरी' आहे, जिथे दोन्ही बाजूने तीव्र भावना होत्या," असा खुलासा राऊतांनी 'एबीपी माझा'च्या मुलाखतीत केला आहे.

Sanjay Raut interview raj uddhav thackeray reunion

सुरुवात राज ठाकरेंनी केली: राऊतांचा गौप्यस्फोट

संजय राऊत यांच्या मते, या पुनर्मिलनाची ठिणगी राज ठाकरेंनी एका मुलाखतीत टाकली होती. "महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी मी दोन पावले मागे घ्यायला तयार आहे," असे राज ठाकरे म्हणाले होते. या विधानानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात चर्चा झाली. राऊत म्हणाले की, "मराठी माणूस आता आपल्याला माफ करणार नाही, हे ओळखून आम्ही पुढाकार घेतला. मराठीपण टिकले तरच हिंदुत्व टिकेल, या भावनेतून ही चर्चा पुढे सरकली."

'हिंदू नंतर, आधी मराठी माणूस'

या नव्या राजकीय समीकरणात 'मराठी' कार्डाला प्राधान्य देण्यात आल्याचे राऊतांनी स्पष्ट केले. "आपण हिंदू आहोतच, पण सध्या मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे आधी मराठी माणसाचे राजकारण करू, हिंदुत्व नंतर बघू," असा नवा अजेंडा या दोन्ही नेत्यांनी स्वीकारल्याचे राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा

राज ठाकरेंचे कौतुक करताना राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. "राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष शून्येतून उभा केला, त्यांनी शिवसेनेवर दावा सांगितला नाही किंवा पक्ष फोडला नाही. त्यांना ते शक्य होते, पण त्यांनी तत्त्व पाळले. याउलट शिंदे आणि पवारांना अमित शाहांनी 'रेडीमेड' पक्ष दिले आहेत," असा टोला राऊतांनी लगावला.

राज-उद्धव एकत्र आल्यामुळे बदलणारी राजकीय गणिते

१. मराठी मतांचे ध्रुवीकरण थांबले: मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या पट्ट्यात मराठी मतांचे विभाजन थांबल्याचे जाणवते, या सुत्राला बळ मिळाल्यास महायुतीसमोर (विशेषतः भाजप आणि शिंदे गट) मोठे आव्हान उभे ठाकेल.

२. अस्तित्वाची लढाई: एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर खरी शिवसेना कुणाची, या वादात राज ठाकरेंची साथ मिळाल्याने उद्धव ठाकरेंची बाजू नैतिकदृष्ट्या भक्कम झाली आहे.

३. मनसे-शिवसेना (UBT) युती : जरी राऊतांनी "काळाच्या पोटात काय दडलंय माहीत नाही" असे म्हटले असले, तरी भविष्यात या दोन पक्षांची युती टिकल्यास 'मराठी अस्मिता' हा सर्वात मोठा निवडणुकीचा मुद्दा ठरेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+