Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दानधर्म करताय का? लाडकी बहीण योजना जवळजवळ बंद,1500 वरून 500 वर आली! - राऊतांची CM फडणवीसांवर टीका

Sanjay Raut criticizes CM Fadnavis, DCM Eknath Shinde over Ladki Bahin scheme : "लाडकी बहीण योजना जवळजवळ बंद झाली आहे. आता ती 1500 रुपयांवरून 500 रुपयांवर आली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान 2100 रुपये दिले जातील असे म्हटले होते. जर निधी वळवला गेला असेल तर त्यात नवीन काय आहे? असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका करत सवालही केला आहे.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. यासह लाडकी बहिण योजनेवरुन सरकारला खडे बोल त्यांनी सुनावले.

Sanjay Raut criticizes CM Fadnavis

तुम्ही दानधर्म करत आहात का?"

संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःच्या खिशातून 1500 रुपये दिले का? हा जनतेचा पैसा आहे... ही योजना बंद करा, तुम्ही 500 रुपये का देत आहात असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच तुम्ही दानधर्म करत आहात का?" अशा कठोर शब्दात खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली.

नेमके काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत म्हणाले, लाडकी बहिण योजना जवळजवळ बंद करण्यात आली. लाड्या-लबाड्या करुन ही योजना सुरु करण्यात आली. सरकारवर टीका करताना राऊत म्हणाले, तुम्ही पंधराशे रुपये देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आता ही योजना जवळजवळ बंद करत आहात, पाचशेवर तु्म्ही या योजनेची रक्कम आणत आहात.

Take a Poll

लाडक्या बहि‍णींना भीक देताय का?

संजय राऊत म्हणाले, विधानसभा निवडणूक काळात लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते परंतु आता हेच मानधन तेवढे तर केलेच नाही पण सरकारआता हे मानधन पाचशे रुपयांवर आणण्याच्या हालचाली करत आहेत.अजित पवार म्हणाले की, मी बोललेलो नाही. कर्ज माफीवर..मी बोललो नाही असे म्हणतात, सरकार तुमचेच आहे ना.. लाडक्या बहिणींना पाचशे रुपयांची भीक देत आहात का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

सरकार लाडक्या बहिणीची फसवणूक करतेय

संजय राऊत म्हणाले, एक मंत्री म्हणतो की, माझ्या खात्याचा पैसा वळवला. अहो पण हा पैसा लाडक्या बहि‍णींनाच दिला ना त्यामुळे रडताय का? मग त्याआधी लाडक्या बहि‍णींना पैसा देताना का हसत होतात, मत हवे म्हणून का? तुमचा पैसा कशाचा, जनतेचाच पैसा आहे ना.. राज्य सरकार लाडक्या बहिणीची फसवणूक करत आहे, एवढेच नाही तर सरकार त्यांच्याच सामाजिक न्याय विभागाची देखील फसवणूक करतेय.

सरकारने चोऱ्या, लबाडी करुन निवडणुका जिंकण्यासाठी पाकिटमारी केली होती, आता तेथे ही पाकिटमारी करणे सोपे नाही. अजित दादा बसले आहेत तिथे खमक्या अर्थमंत्री .. अजित पवार अर्थमंत्री म्हणून खमक्या माणूस आहे. आमच्या सरकारच्या वेळी हे आम्ही पाहिलेले आहे. ते अजितदादांना शकोनी म्हणाले, देशाला आर्थिक शिस्त लावणं याला तुम्ही शकोणी म्हणत असाल तर तुम्ही जी लुटमार केली आणि सत्तेत आले त्याला दुर्योधन म्हणायचे का?अजित पवार उत्तम अर्थमंत्री आहेत ते मी सांगायची गरज नाही. ते आहेतच.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+